वात पित्त आणि कफ यांचे शरीरातील संतुलन कसे ठेवावे

वात पित्त आणि कफ: आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरात तीन दोष असतात: वात, पित्त आणि कफ. जेव्हा हे दोष संतुलित असतात तेव्हा आपण निरोगी असतो. जर एखाद्या दोषाचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास, आपण आजारी पडू शकतो. वात, कफ, पित्त ह्या शक्ती असुन शरीरभर पसरलेल्या असतात. चला तर जाणून घेऊया वात, पित्त आणि कफ यांचे कमी आणि जास्त प्रमाण झले तर त्याचे दुस्परिणाम काय दिसून येतात आणि शरीरातील संतुलन कसे ठेवावे याचा आढावा घेऊया.

वात पित्त आणि कफ

वात :

शरीरात वात ही एक शक्ती असुन त्यामुळे शरीरास गति मिळते. शरीरात वात व आकाशतत्व यांचे प्रमाण वाढले तर वाताचे संतुलन बिघडते व त्यामुळे संधिवात, गुडघेदुखी, रक्तदाब, बध्दकोष्ठता, हाडांची दुखणी, हृदयरोग, मेंदूचे विकार, हायपर टेंशन, हातपायांना मुंग्या येणे, रक्तभिसरणात समस्या, सायटीका, मानदुखी, मानसिक रोग, पक्षघात इत्यादी प्रकारचे ऐंशी विकार होतात. वाताचे आधिक्य शरीरात नाभीच्या खालच्या भागात असते. शरीराच्या खालच्या भागाचे नियंत्रण व क्रिया वातामुळे होतात. वातामार्फत चालणे, उठणे, बसणे या क्रिया केल्या जातात. वात प्रकृती असणारी व्यक्ती खूप बुटकी किंवा खूप उंच, बारीक व कुरळ्या केसांची असते.

वात तत्व हे वायू तत्व असल्याने वातप्रकृतीच्या व्यक्ती बारीक, जास्त खाणाऱ्या, अस्थीर, थंड शरीराच्या असतात. त्या लवकर जाड होऊ शकत नाहीत. या व्यक्ती सर्जनशील, कल्पक, तल्लख बुध्दीच्या असतात, यांना बध्दकोष्ठता, वैफल्य, अस्वस्थता, खिन्नता हे विकार असु शकतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी जमेल तेव्हा तीळाच्या तेलाने शरीराची मालीश करावी, थंड तसेच रुक्ष/कोरडे पदार्थ खाणे टाळावे, ध्यान साधना, प्राणायाम हे व्यायाम सतत करावे. ‘वात पित्त आणि कफ’

वात पित्त आणि कफ
वात, पित्त आणि कफ दोष

पित्त:

शरीरात पित्त ही एक शक्ती असुन त्यामुळे पचनाचे कार्य होते. शरीरातील अग्नितत्व वाढल्यास पित्ताचे संतुलन बिघडते व त्यामुळे आम्लपित्त, जळजळणे, अल्सर, पोटाचे विकार, सांधे सुजणे, केस पांढरे होणे, केस गळणे, तारुण्यपिटीका, कोलायटीस, घसा सुजणे, त्वचा रोग, सोरायसीस, एक्झीमा इत्यादी प्रकारचे चाळीस विकार होतात. ‘वात पित्त आणि कफ’

पित्ताचे पाच प्रकार आहेत.

1) पाचक पित्तः हे पोटात असते व पचनाचे कार्य करते.

2) आलोचक पित्तः हे डोळ्यात असुन दृष्टीस सहाय्यक असते.

3) साधक पित्तः याचे स्थान हृदयात असुन ते भावनांवर नियंत्रण ठेवते.

4) भाजक पित्तः याचे अस्तीत्व त्वचेच्या रंगात असते.

5) रंजक पित्तः ह्यामुळे रक्ताला रंग प्राप्त होतो.

पित्ताचे आधिक्य शरीरात हृदय आणि नाभी या मध्य भागात असते. पित्तामुळे अन्न खाल्ल्यानंतर होणारे पचन व पुढील इतर क्रिया शक्य होतात. पित्त प्रकृती असणारी व्यक्ती मध्यम बांध्याची, गहूवर्णी, लालसर त्वचा असलेली, प्रत्येक कामात अग्रेसर व महत्वाकांक्षी, पचन लवकर होणारी, जास्त भुक लागणारी, तापट स्वभावाची असते. यांचे केस लवकर गळतात. या लोकात नेतृत्व करण्यास लागणारे गुण असतात. ‘वात पित्त आणि कफ’

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी गरम पदार्थ, तिखट, मसाल्याचे, आंबट पदार्थ खाणे टाळावे. आवळा चूर्ण, बडी शेप व खडीसाखर सम प्रमाणात घेऊन रोज एक चमचा सेवन करावी तसेच रोज एक चमचा धणे पावडर पाणी किंवा मधाबरोबर घ्यावी. डोके थंड ठेवावे, राग नियंत्रणात ठेवावा, प्राणायाम करावा.

कफ:

शरीरातील कफ ही शक्ती जोडण्याचे (संधी) काम करते. हाडांवर मांस, स्नायु या कफ शक्तीमुळेच जोडले जातात. शरीरातील पृथ्वी व जल तत्वाचे प्रमाण बिघडले तर कफाचे आधिक्य होते, ह्यामुळे वजन वाढणे, श्वास विकार, छातीत दुखणे, घश्याचे विकार, दमा, खोकला, ट्युमर, थायरॉइड, डोळ्याचे, कानाचे, गळ्याचे, मेंदूचे इत्यादी प्रकारचे वीस विकार होतात. कफाचे आधिक्य शरीरात हृदयाच्या वरच्या भागात असते, हयामुळे डोक्याची स्थिरता व शांतता प्राप्त होते. कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तीचा रंग पांढरट, स्थूल बांधा असुन ती आळशी असते. या व्यक्तींची कामाची बैठक चांगली असते. यांना फिरण्याचा कंटाळा येतो. कफ तत्व हे पृथ्वी तत्व असल्याने कफ प्रकृतीच्या व्यक्ती जाडों असतात. त्या लवकर बारीक होऊ शकत नाहीत. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी गरम पदार्थ, आलं, लसुण, मसालेदार पदार्थ अधिक खावे. रोज व्यायाम करावा, लवकर हालचाल करण्याची सवय लावावी, पंचकर्म उपचार करून शरीर शुध्दी करावी. उपवास करावेत, गरम पाण्यात आल टाकुन ते पाणी दिवसभर प्यावे. सोना बाथ, स्टीम बाथ हे प्रयोग करून घाम काढावा. थंड, गोड, तेलकट, लवकर न पचणारे पदार्थ खाऊ नये. ‘वात पित्त आणि कफ’

शास्त्रानुसार बालपणाचा काळ हा कफाचे प्राबल्य असणणारा काळ असतो हयामुळे शरीराची वाढ होत असते.

तरुणपणाचा काळ पिताचे प्राबल्य असणणारा असतो. हयामुळे शरीराला जोम व उत्साह प्राप्त होतो. तर वृध्दापकाळ हा वाताचे प्राबल्य असणणारा काळ असतो. ह्यामुळे शरीराची शक्ती कमी होते, झीज होते.

दिवसाचे 12 तास व रात्रीचे 12 तास यांचे प्रत्येकी तीन भाग केले असता सकाळी व सायंकाळी 6 ते 10 हा काळ कफाचे आधिक्य असणारा, दुपारी व रात्री 10 ते 2 हा काळ पित्ताचे आधिक्य असणारा, तर दुपारी व रात्री 2 ते 6 हा काळ वाताचे आधिक्य असणारा असतो. ‘वात पित्त आणि कफ’

वात पित्त आणि कफ यांचे संतुलन कसे ठेवावे:

आहार:

 • वात: वात वाढवणारे पदार्थ टाळा जसे की थंड, कोरडे आणि हलके पदार्थ. उष्ण, ओले आणि जड पदार्थ खा.
 • पित्त: पित्त वाढवणारे पदार्थ टाळा जसे की तेलकट, तिखट आणि आंबट पदार्थ. गोड, थंड आणि कडू पदार्थ खा.
 • कफ: कफ वाढवणारे पदार्थ टाळा जसे की गोड, थंड आणि जड पदार्थ. तीक्ष्ण, हलके आणि उष्ण पदार्थ खा. ‘वात पित्त आणि कफ

जीवनशैली:

 • वात: नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा.
 • पित्त: सूर्यप्रकाशाचा अतिरेक टाळा, शांत रहा आणि थंड पेयं प्या.
 • कफ: नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि द्रवपदार्थाचे सेवन वाढवा.

औषधी वनस्पती:

 • वात: अश्वगंधा, शतावरी, आणि दालचिनी सारख्या वनस्पती वात समतोल साधण्यास मदत करतात.
 • पित्त: गुलाब जल, चंदन आणि भोपळा सारख्या वनस्पती पित्त समतोल साधण्यास मदत करतात.
 • कफ: हळद, तुळस आणि अद्रक सारख्या वनस्पती कफ समतोल साधण्यास मदत करतात.

योग:

 • वात: सूर्यनमस्कार, भुजंगासन आणि पश्चिमोत्तानासन सारख्या आसनांमुळे वात समतोल साधण्यास मदत होते.
 • पित्त: शीतली प्राणायाम, अनुलोम विलोम आणि भस्त्रिका सारख्या प्राणायामामुळे पित्त समतोल साधण्यास मदत होते.
 • कफ: कपालभाती, भस्त्रिका आणि उज्जयी प्राणायामामुळे कफ समतोल साधण्यास मदत होते.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हे सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आपल्यासाठी काय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वात पित्त आणि कफ Yoga Practice

3 Comments

Skip to content