विश्व बंजारा दिवस आणि इतिहास

विश्व बंजारा दिवस: हा दिवस जगभरातील बंजारा समुदायाला त्यांचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा साजरी करण्याची आणि एकमेकांशी जोडण्याची संधी प्रदान करतो.

८ एप्रिल रोजी जागतिक बंजारा दिवस साजरा केला जात आहे. भारतात, भटक्या जाती, ज्या कधीही एकाच ठिकाणी राहत नाहीत, त्यांना पारथी, सांसी, बंजारा आणि बवरिया इत्यादी मानले जाते. यामध्ये बंजारा समाज हा सर्वात मोठा समाज मानला जातो. देशातच नव्हे तर परदेशातही बंजारा समाज प्रत्येक जाती धर्मात आहे. हा समाज देश-विदेशात अनेक नावांनी ओळखला जातो. जसे युरोपातील जिप्सी, रोमा इ. तर भारतात गोर बंजारा, बामनिया बंजारा, लडानिया बंजारा इ. संपूर्ण भारतात बंजारा समाजाची लोकसंख्या 10 कोटींहून अधिक आहे. बंजारा हा शब्द वंजारा या शब्दापासून बनला आहे. भारतात प्रामुख्याने बंजारा समाजाच्या ५१ पेक्षा जास्त जाती आढळतात.

विश्व बंजारा दिवसाचा इतिहास

08 एप्रिल 1981 रोजी जर्मनीमधे जगभरातील बंजारा समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी रोमा ,जिप्सी आणि विश्व बंजारा समाजाची बैठक झाली होती. या बैठकीमधे भारताकडुन स्व. रामसिंगजी भानावत आणि स्व.रणजीत नाईक यांनी भाग घेतला होता. बंजारा समाज एकता आणि रोमा प्रश्नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त रोमा समुदायाविषयी भेदभाव व मानवाधिकार हनन या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दरवर्षी 08 एप्रिल हा दिवस विश्व रोमा बंजारा दिवस म्हणुन साजरा करण्याचे ठरले. बंजारा समुदाय हा एक भटक्या समुदाय आहे जो भारतातून उगम पावला आणि जगभरात पसरलेला आहे. ते व्यापारी, शेतकरी आणि पशुपालक म्हणून काम करतात. बंजारा समुदाय त्यांच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहेत. रोमा लोक भारताचे मुळ रहीवाशी असुन ते मुळचे बंजारा आहेत. 6व्या शतकापासुन 11 व्या शतकापर्यंत ते भारतातुन अफगानिस्तान मार्गे युरोपमधे गेले असल्याचे मानले जाते. यूरोप मधिल विविध देशात रोमा बंजारा समाजाची लोकसंख्या दोन कोटीपेक्षाही अधिक आहे. रोमानी भाषा हिंद आर्य भाषा गणातिल असुन बंजारा,गुजराती,राजस्थानी भाषेतिल अनेक शब्द या भाषेमधे आहेत.

बंजारा लोक भारतातून यूरोपमध्ये कसे स्थलांतर झाले याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. कोणताही एक निश्चित सिद्धांत नाही, परंतु काही संभाव्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

मध्य आशिया: 11 व्या आणि 12 व्या शतकात, बंजारा लोक मध्य आशियातून पश्चिमेकडे स्थलांतरित झाले असल्याचे मानले जाते. ते व्यापार आणि चराईसाठी नवीन प्रदेश शोधत होते. तेथून, ते तुर्कस्तान आणि इराणमधून प्रवास करत युरोपमध्ये पोहोचले.

भूमध्यसागरीय मार्ग: काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की बंजारा लोक 14 व्या शतकात भूमध्यसागरीय मार्गाद्वारे युरोपमध्ये पोहोचले. ते इजिप्त आणि उत्तर आफ्रिकेतून प्रवास करत इटली आणि स्पेनमध्ये पोहोचले.

बाल्कन मार्ग: 15 व्या शतकात, बंजारा लोक ओट्टोमन साम्राज्याद्वारे नियंत्रित बाल्कन प्रदेशातून युरोपमध्ये प्रवेश करत होते. ते व्यापार आणि चराईसाठी नवीन प्रदेश शोधत होते. तेथून, ते मध्य युरोप आणि पूर्व युरोपमध्ये पसरले.

Center for Secular and Molecular Biology Institution Hyderabad या संस्थेचे Senior Scientist डॉ. निरज रॉय यांच्या नेत्रुत्वाखाली जगातिल अनेक विश्वविद्यालयाच्या Scientists नी पूर्व युरोपमधिल रोमा लोकांची D. N. A. चाचणी केली असता भारतीय बंजारा, शिकलीगार या समाजाशी साम्य आढळले. युरोपमधिल रोमा बंजारा लोकांनी नाझीकडुन (हिटलर) 1938 मधे ‘जिप्सी क्लिनअप विक ‘राबविण्यात आले. दुसर्या महायुद्धाच्या काळात या समाजाला लक्ष करण्यात आले होते. युद्धकाळात त्यांना विशिष्ट शिबिरामधे कैदेत ठेवण्यात आले. स्त्रीयां, बालक, माणसे यांना नामोहरम करण्यात आले. उपासमार आणि भुखबळीमुळे 20,000 रोमा बंजारे म्रुत्युमुखी पडले.

आज रोमा युरोपमधिल सर्वाधिक गरीब, अल्पसंख्याक समुदाय आहे. हे लोक भटके असल्यामुळे इंग्रजीमधे यांना जिप्सी म्हणतात. युरोपमधे या लोकांना नागरीकत्व प्राप्त करण्यात अनंत अडचणी येत आहेत. भेदभाव केला जातो. मानवाधिकार नाकारला जातो. फ्रांसने गेल्या काही दिवसापुर्वी रोमा लोकांना रोमानिया आणि बल्गेरीयामधे हुसकावुन लावले. हा मुद्दा फ्रांसमधिल काही मानवाधिकार संघटनांनी लावुन धरला होता.या समुदायाच्या मानवाधिकार रक्षणासाठी European Roma Rights Center (ERRC) तसेच Roma Rights Network या स्वयंसेवी संस्था युरोपमधे कार्यरत आहेत. युरोपमधे गेल्यानंतर रोमा समुदाय युरोपातिल बायजेंटाईन साम्राज्याचा भाग बनले. हे साम्राज्य स्वत:ला रोमन साम्राज्याचे वारसदार मानतो. म्हणुन या लोकांनी स्वत:ला रोमा हे नांव धारण केले असे मानले जाते.

1983 मधे तत्कालीन पंतप्रधान इंदीराजींनी रोमा महोत्सवात ‘रोमा लोगोंका इतिहास विपत्ति और वेदना का इतिहास है, लेकीन नियत्ती की थप्पेडोपर मानवीय उत्साह का परिचायक है’. बांधवांनो रोमा बंजारा समाज युरोपमधे आजही खुप कष्टप्रद जीवन जगतो. रोमा समुदायाविषयी आपल्या देशातिल बंजारा बांधवामधे अधिक जागरुकता झाली पाहीजे. स्व. रामसिंग भानावतजी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेकदा या समाजाच्या मानवाधिकाराबाबत प्रयत्न केले. ‘विश्व बंजारा दिवस’

विश्व बंजारा दिवस कसा साजरा केला जातो

विश्व बंजारा दिवस जगभरातील विविध देशांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो. बंजारा समुदाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात, जसे की नृत्य, संगीत आणि कविता. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कार्यशाळा आणि परिषदा देखील आयोजित केल्या जातात.

विश्व बंजारा दिवस

विश्व बंजारा दिवसाचे महत्त्व

विश्व बंजारा दिवस हा बंजारा समुदायाला त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची आणि जगाला त्यांच्या योगदानाबद्दल शिक्षित करण्याची संधी प्रदान करते. हा दिवस भेदभाव आणि सामाजिक बहिष्कारासाठी लढण्यासाठी आणि बंजारा समुदायाच्या हक्कांसाठी लढण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.

निष्कर्ष:

विश्व बंजारा दिवस हा बंजारा समुदायासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस त्यांना त्यांच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि जगात त्यांचे योगदान देण्यास प्रेरित करतो.