नेमकं जगावं कस: नेमकं जगावं कस हा प्रश्न खूपच मनोरंजक आहे. जगावं कसं, याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असतं. कारण आपल्या सर्वांच्या स्वप्नं, इच्छा, मूल्यं आणि परिस्थिती वेगवेगळ्या असतात.
तरीही, आपण सर्वजण एकाच गोष्टीची शोध घेत असतो – एक समाधानकारक आणि आनंददायी जीवन कस जगायचं हे खालील उध्दरणासहित बघूया.
नेमकं जगावं कसं ? तर शाळेतल्या शिक्षकासारखं…!
तासन् तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही मी घडवलय याचा माज नाही….!
अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो; परंतु त्यातल एकही मूल आपलं नाही… आपण फक्त शिकण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…!
निकालासाठी एखाद्या वेळी दुसऱ्यांशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं मानून दुसऱ्यांशी बोलत राहायचं….,!
“पुढे चला… खूप शिका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….
खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच…
पण कुणावर विशेष लोभ नाही…
कोणावर राग तर मुळीच नाही…
कुणाचा द्वेष नाही…
कुणाचा तिरस्कार नाही…
आपला संबंध फक्त शिकवण्यापुरता… !
कुणी मध्येच शाळा सोडून गेला तर त्याचे दुःख सोसायच…
कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायच…
दोघांसाठी नेहमीच वर्गाच दार उघडायचं…
येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…
दहावी-बारावीला पोहोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे….
प्रत्येक वर्गात थोडावेळ थांबायच ….
आळोखे पिळोखे देत, आपलंच वर्ग आहे, असं समजून थोडावेळ रेंगाळायचं….
पण त्या वर्गात भावनिक गुंतायच नाही….
आपण इथे थांबता कामा नये, हे स्वतःशी बजावत, पुन्हा दुसऱ्या वर्गात पुढच्या “तासिकेला” जायचं….
“सिंगल” बेल मारली ,की शिकवण थांबावायचं… “डबल”बेल मारली की दुसर्या वर्गात निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे….
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…!
दहावी – बारावीचा टप्पा म्हणजे शेवटचा स्टॉप आहे….सगळ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करून घ्यावे…. असं सर्वांना बजावत स्वतःच निरोप द्यायचा आणि परीक्षा संपल्या की “मुक्या मनानेच” इतर विद्यार्थ्यां सोबत अध्यापनात रमण्यासाठी निघून जायचं…. !
उद्या कोणत्या वर्गात जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या मजल्यावर जायचं ? वर्ग कोणता असेल…. ? हे ठरवणारा वेगळाच असतो…
उद्या कोणत्या तासिकेचे निरीक्षण असेल याची माहिती नाही… निरीक्षक कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत विद्यार्थी कोण असतील याची शाश्वती नाही…
शाश्वत एकच आहे… ते म्हणजे अध्यापन…!
आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… अध्यापन कोणाच ना कोणाच तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि चिरंतन…!
आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… अधयापन मात्र सुरूच राहणार आहे…. निरंतर आणि निरंतर…!
एक शिक्षक
नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…!
तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….!
आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…!
चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,!
“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….
खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच…
पण कुणावर विशेष लोभ नाही…
कोणावर राग तर मुळीच नाही…
कुणाचा द्वेष नाही…
कुणाचा तिरस्कार नाही…
आपला संबंध फक्त तिकिटापुरता… !
कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही…
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही…
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं…
येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…
मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते….
प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं ….
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं….
पण त्या गावात अडकायचं नाही….
आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….
“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे….
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…!
हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. !
उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो…
उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…
शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…!
आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
मित्रहो वरील हे दोन उद्धरण आपल्याला अधिक चांगले जीवन जगण्यास मदत करू शकतात. याचा मात्र, शोध आपण स्वतःला घ्याचा आहे.
जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासात आपल्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. आपण यशस्वी होऊ, आपण अपयशी होऊ, आपण आनंदी होऊ, आपण दुःखी होऊ शकतो. पण या सगळ्या अनुभवांमधून आपण शिकतो आणि आपण वाढतो.
जगावं कसं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सतत शिकत राहणं गरजेचं आहे. पुस्तकं वाचा, नवीन लोकांना भेटा, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा आणि आपल्याला महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या.
आपण स्वतःला खूपच महत्व देणं गरजेचं आहे. आपण स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आपण जे करू इच्छितो ते आपण करू शकतो.
जीवन हे एक सुंदर उपहार आहे. या उपहाराला आपण कसं स्वीकारतो हे आपल्यावर अवलंबून असतं. आपण आपलं जीवन सुंदर बनवू शकतो.
महत्वाचं म्हणजे, आपण आपल्या स्वतःच्या शर्तीवर जगू शकतो. आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये आनंद येतो, आपल्याला काय महत्वाचं वाटतं, आपलं स्वप्न काय आहे याचा विचार करून आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीने जू शकतो.
अखेरीस, जगावं कसं हा प्रश्न आपल्यालाच स्वतःला विचारायचा आहे आणि त्याचं उत्तरही आपल्यालाच स्वतःला शोधायचं आहे.
हे पण वाचा: What was the Journey of Human Towards Knowledge?