शिक्षकाचा पगार: ही कथा खूप प्रेरणादायक आहे आणि शिक्षकांच्या महत्वाबद्दल खूप काही सांगते. शिक्षकांच्या कामाचा जोश, त्यांची मेहनत आणि त्यांचे कष्ट अनमोल असतात. शिक्षकाच्या प्रत्येक वाक्यामध्ये त्याने केलेली कित्येक वर्षांची मेहनत आणि त्याच्या अनुभवाचा ठसा असतो.
कधी कधी समाज शिक्षकांच्या कामाचा योग्य सन्मान करत नाही, पण ही कथा आम्हाला लक्षात आणून देते की शिक्षकांचे ज्ञान, त्यांचा अनुभव, आणि त्यांची शिकवण्याची क्षमता किती महत्त्वाची आहे. पिकासोच्या पेंटिंगसारखं, एक शिक्षक ४० मिनिटांमध्ये जे सांगतो, ते त्याच्या पूर्ण आयुष्याच्या अनुभवाचा निचोड असतो.
त्याचप्रमाणे, एक शिक्षक जेव्हा शिकवतो, तेव्हा तो केवळ ज्ञान देत नाही, तर तो विद्यार्थ्यांना एक दिशा आणि भविष्य देत असतो. शिक्षकांचा पगार फक्त त्यांच्या बोलण्यात नाही, तर त्यांच्या कार्यात, कष्टात आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या प्रभावात आहे. तर मित्रहो सर्व शिक्षकांचे काम खरंच अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यांचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. ते खालील उदाहरणादाखल स्पस्ट होताना दिसून येते. ‘शिक्षकाचा पगार’
शिक्षकाचा पगार यावर एक कथा
पिकासो (Picasso) हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्ज अख्ख्या जगात कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांना विकल्या जात असत!
एक दिवस रस्त्यानं जात असता, एका महिलेची नजर पिकासोकडे गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, “सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?
पिकासो हसत म्हणाला, “मी इथं रिकाम्या हातानं आलोय. माझ्यापाशी कांहीही साधनं नाहीत. मी पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी एक पेंटिंग नक्की बनवून देईन.”
परंतू त्या महिलेनं आता हट्टच धरला. ती म्हणाली, “मला आत्ताच एक पेंटिंग बनवून द्या. पुन्हा कधी आपली भेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही.”
पिकासोनं मग आपल्या खिशातून एक छोटासा कागद काढला आणि आपल्या पेननं तो त्या कागदावर काहीतरी चित्र काढू लागला. जवळपास दहा मिनिटांमध्ये पिकासोनं त्या कागदावर एक पेंटिंग काढलं आणि तो कागद त्या महिलेला देत तो म्हणाला, “हे घ्या पेंटिंग. तुम्हाला याचे एक मिलियन डॉलर्स सहज मिळतील.”
महिलेला मोठं आश्चर्य वाटलं. ती मनात म्हणाली, ‘ह्या पिकासोनं केवळ 10 मिनिटांत घाईघाईनं हे एक काम चलाऊ पेंटिंग तयार केलंय आणि मला म्हणतोय की, हे मिलियन डॉलर्सचं पेंटिग आहे.’ मात्र उघडपणे काही न बोलता तीनं ते पेंटिंग उचललं आणि ती मुकाटपणे आपल्या घरी आली. तिला वाटलं पिकासो आपल्याला मूर्ख बनवत आहे. ती बाजारात गेली आणि पिकासोनं आपल्यासाठी बनवलेल्या पेंटिंगची किती किंमत मिळू शकेल याची तीनं तिथं चौकशी केली. या चित्राची किंमत सुमारे दहा लाख डॉलर्सपर्यंत मिळू शकेल असं तिला जेव्हा कळलं तेव्हा, तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. ‘शिक्षकाचा पगार’
ती धावत धावतच पुन्हा एकदा पिकासोकडे गेली आणि त्याला म्हणाली, “सर आपण एकदम योग्य सांगितलं होतं. या चित्रांची किंमत खरोखरच सुमारे दहा लाख डॉलर्स आहे.”
पिकासो हसून म्हणाला, ” मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.”
ती महिला म्हणाली, “सर, आपण मला आपली शिष्या करवून घ्याल कां? मलाही पेंटिंग कसं बनवायचं ते आपण शिकवा. म्हणजे जसे तुम्ही दहा मिनिटांमध्ये दहा लाख डॉलर्सचं पेंटिंग बनवलं, तसंच मी अगदी १० मिनटांत जरी नाही तरी १० तासांत का होईना चांगलं पेंटिंग बनवू शकेन अशी आपण माझी तयारी करून द्या.” ‘शिक्षकाचा पगार’
पिकासो हसतच म्हणाला, “हे जे पेंटिंग मी १० मिनटांत बनवलं आहे ते शिकण्यासाठी मला तीस वर्ष लागलेली आहेत. मी आपल्या जीवनाची तीस बहुमूल्य वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. तुम्हीही इतकीच वर्षे शिकण्यासाठी द्याल, तर तुम्हीही माझ्यासारखीच चित्रे काढं शकाल.”
ती महिला अवाक् आणि निःशब्द झाली. ती पिकासोकडे नुसती पाहातच राहिली.
एक शिक्षकाला ४० मिनटांच्या एका लेक्चरसाठी जो पगार दिल्या जातो, तोच उपरोक्त कथेबद्दल बरंच कांही सांगून जातो. एका शिक्षकाच्या एका एका वाक्यामागे त्याची कित्येक वर्षांची मेहनत असते.
हे पण वाचा: एक शेतकरी व्यथा
समाजाला वाटतं की , शिक्षकाला केवळ बोलायचंच तर असतं. त्याचाच पगार घेतात हे इतकाल्ले. इथं हे विसरून चालणार नाही की, आज जगात सन्मान्य पदांवर जितके म्हणून लोक आरूढ आहेत, त्यांच्यापैकी अधिकांश कुठल्या ना कुठल्या शिक्षकांमुळेच त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. ‘शिक्षकाचा पगार’
जर आपणही शिक्षकाच्या वेतनाला फुकटचं समजत असाल ,तर मग एक वेळ ४० मिनटांचं प्रभावी तसंच अर्थपूर्ण लेक्चर देऊन दाखवा. आपल्याला आपली क्षमता किती आहे याची लगेच जाणीव होऊन जाईल!
सर्व शिक्षकांना समर्पित………………..