Skip to content

Journey Of Knowledge

Journey Of Knowledge

  • Home
  • Agriculture
    • Farming
  • Lifestyle
    • Events and News
    • Health & Fitness Tips
    • Motivational Story
  • Sport News
  • Education
  • Toggle search form
  • Holi Festival in 2024
    Holi Festival in 2024: A Colorful Celebration of Joy Events and News
  • Top Universities in the world
    Top Universities in the World for 2024 Education
  • Makar Sankranti 2025: A Festival of Unity and Joy Events and News
  • Thanksgiving Harvest Salad
    Delicious Thanksgiving Harvest Salad Recipe: A Bounty of Flavors Health & Fitness Tips
  • Conducting a Story Telling Activity for Students Education
  • Indian Biographies for Children's
    Indian Biographies for Children’s: A Window to Inspiring Lives Motivational Story
  • Republic day speeches
    Republic Day Speeches प्रजासत्ताक दिन भाषण Education
  • How to Lower Cortisol Levels Naturally Health & Fitness Tips
Outdoor School Games for Kids

20 Outdoor School Games for Kids (गोलातील खेळ)

Posted on May 19, 2024August 13, 2024 By Shubhangi Pawar 1 Comment on 20 Outdoor School Games for Kids (गोलातील खेळ)

Outdoor School Games for Kids: शाळेमधील इयत्ता १ तो १० वी प्रयंतच्या विद्यार्थीयासाठी आजच्या टेकनॉलॉजि च्या युगात आऊटडोअर स्कूल गेम (Outdoor School Games for Kids) ची गरज भासणार आहे कारण टेकनॉलॉजि मुले मुलाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कमी होत चालली आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थीना दररोज एक तास खेळाचा असतो त्यामध्ये विद्यार्थीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक उन्नती होण्यासाठी खाली दिलेले काही खेळ अमलात आणावे. जेणेकरून मुलामध्ये वैक्तिक व सामाजिक भावना वाढीस लागेल.

Outdoor School Games for Kids

या लेखामध्ये एकूण २० (गोलातील खेळ) ‘Outdoor School Games for Kids’ वेगवेगळे खेळांचा सामाविस्ट करण्यात आलेला आहे त्याचा वापर मुलाच्या कलागुणना, शारीरिक व बौद्धिक उन्नती होण्यासाठी करावा.

१. खेळाचे नाव – खो खो (जोडीदारासह)

वर्गरचना – विद्यार्थ्यांचा हात धरून गोल करा. त्यांच्या एकापुढे एक अशा जोड्या करा. एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगा. दुसऱ्याला त्याला पकडण्यास सांगा.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी जोडीने एकामागे एक असे गोलात उभे राहतील. दोन वर्तुळे होतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला शिवायला सांगावे व दुसऱ्यास पळण्यास. पळणारा विद्यार्थी गोलातील कोणत्याही एका जोडीसमोर उभा राहून टाळी वाजवेल. त्याच्या पाठीमागील गोलातील विद्यार्थी धावेल. ज्याला टाळी वाजवून खो मिळाला असेल तो पाठीमागे जाऊन उभा राहील. धावणारा विद्यार्थी टाळी वाजल्यावर त्याच वेळी तोंडाने खो असेही म्हणेल.

निर्णय – पकडणाऱ्याने धावणाऱ्यास शिवले तर तो बाद होईल. नंतर पकडणारा धावेल. बाद होणारा त्याला पकडेल. त्यानंतर दुसऱ्या जोडीला संधी द्यावी. ‘Outdoor School Games for Kids’

२. खेळाचे नाव – खो खो (जोडीदाराचा हात धरून खो)

वर्गरचना – सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जोडीदाराचा हात धरून वर्तुळात उभे करावे. एकास धावण्यास व दुसऱ्यास शिवण्यास सांगावे.

खेळाचे वर्णन – जोडीदाराचा हात धरून खो. सर्व विद्यार्थी हात धरून वर्तुळात उभे राहतील. एका जोडीतील एका विद्यार्थ्याला धावण्यास सांगावे. दुसऱ्यास पकडण्यास, धावणारा विद्यार्थी हात धरून उभे असलेल्या विद्यार्थ्यांचा हात धरेल. त्याच वेळी तोंडाने खो म्हणेल. त्यानंतर डाव्या किंवा उजव्या बाजूकडील विद्यार्थी धावेल.

निर्णय– बाद झाल्यावर उलट जोडी करा. नंतर नवीन जोडीवर राज्य द्यावे.

३. खेळाचे नाव – घाणेरडा माणूस

वर्गरचना – सर्वांना गोलात उभे करावे. एकावर राज्य द्यावे.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी गोल करून आतमध्ये तोंड करून उभे राहतील एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे. राज्य असणारा विद्यार्थी वर्तुळातील उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जाऊन उभा राहील. त्यावेळी वर्तुळातील विद्यार्थी नाबाद राहण्यासाठी आपला कोणताही एक पाय डावा उजवा वरती उचलून त्याच्या खालून हात घालून नाक पकडून उभा राहील, नाक पकडण्यापूर्वी जर राज्य असणारा विद्यार्थी त्याला शिवला तर ता विद्यार्थी बाद होऊन त्याच्यावर राज्य दिले जाईल. ‘Outdoor School Games for Kids’

निर्णय – बाद झालेला खेळाडू विद्यार्थी ‘राज्य’ घेईल.

४. खेळाचे नाव – राम राम पावणं

वर्गरचना – हात धरून मोठा गोल करा.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी मोठा गोल करून आत तोंड करून उभे राहतील. एका विद्यार्थ्यावर राज्य द्यावे. तो गोलाच्या बाहेरून धावत असताना कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारील. तो विद्यार्थी विरुद्ध बाजूने धावू लागेल. जेव्हा हे दोघे एकत्र भेटतील त्यावेळी राम राम पावणं म्हणून एकमेकांना नमस्कार करतील आणि दोघेही मोकळ्या जागेवर जाण्याचा प्रयत्न करतील. ज्याला जागा मिळणार नाही तो बाद होईल. याच खेळात राम राम पावणं, नमस्कार, बैठक, जोर, दंड याचाही उपयोग करून घ्यावा.

निर्णय – सर्व नियमांचे पालन करून जो विद्यार्थी मोकळ्या जागेवर जाऊन प्रथम उभा राहील तो विजयी. ज्याला जागा मिळणार नाही त्याचेवर राज्य द्यावे.

५. खेळाचे नाव घरी जा.

साहित्य – चुना

वर्गरचना – वर्गाला मोठा गोल करून उभे करा. प्रत्येकाला त्याच्याभोवती ठळक पावलाएवढे वर्तुळ काढण्यास सांगा. चुन्याने ते ठळक करा. विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा ४/५ जणांना वर्तुळ काढण्यास सांगू नये.

खेळाचे वर्णन – मोठा गोल करून उभे रहावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याभोवती छोटासा गोल किंवा चौकोन ठळक आखण्यास सांगावा. हा चौकोन किंवा गोल हे त्या विद्यार्थ्याचे घर झाले. त्यातील एकावर राज्य द्यावे. त्याचा चौकोन गोल पुसून टाकावा. हा विद्यार्थी बेघर झाला. तो वर्तुळाच्या बाहेरून धावत असताना घरातील तीन-चार जणांच्या पाठीवर थाप मारेल. ज्याच्या पाठीवर धाप बसेल ते विद्यार्थी बेघर विद्यार्थ्यांमागून धावतील. बेघर विद्यार्थी एका घरात जाऊन “घरी जा” असे सांगेल. त्यानंतर त्याच्या मागून धावणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोकळ्या घरात जाऊन उभे रहावे. ज्याला घर मिळणार नाही तो बेघर. त्याच्यावर राज्य द्यावे. ‘Outdoor School Games for Kids’

निर्णय – ज्या विद्यार्थ्यांना घर मिळणार नाही ते बाद होतील. शेवटपर्यंत घर मिळविणारा विद्यार्थी विजयी ठरेल.

६. खेळाचे नाव – पुतळा (मूर्ती)

वर्गरचना – हात धरून वर्गाचा मोठा गोल करा.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी गोलात दहिने बाये मूड करून धावतील. शिक्षक शिट्टी वाजवतील किंवा “पुतळा” मोठ्याने म्हणतील. त्याच वेळी धावणारे सर्व विद्यार्थी कोणत्याही एका स्थितीत पुतळ्याप्रमाणे उभे राहतील. जे हालचाल करतील ते बाद होतील. गोल मोठा करावा. पुढल्याच्या मागे सर्वजण नीट धावतील असे बघावे. गोल आखून घेतल्यास उत्तम पुतळा. मूर्ती शब्दच वापरला पाहिजे असे नाही तर एक छोटी शिट्टी वाजवूनही विद्यार्थ्यांना धावताना थांबवता येईल.

निर्णय – शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी ‘उत्तम पुतळा’ म्हणून टाळ्या वाजवून त्याचा गौरव करावा.

७. खेळाचे नाव – डोंगर पेटला, पळा रे पळा साहित्य – चुना

वर्गरचना – हात धरून मोठा गोल करा. चुन्याने गोल आखा. (काही वेळाने धावण्याची दिशा बदलावी) ‘Outdoor School Games for Kids’

खेळाचे वर्णन – डोंगर पेटला, पळा रे पळा, मोठ्या गोलावर विद्यार्थी दहिने बाये मूड करून योग्य अंतर घेऊन उभे राहतील. मध्यभागी शिक्षक उभे राहतील. धावा म्हणतील त्याच वेळी डोंगर पेटला म्हणतील. गोलातून धावणारे विद्यार्थी पळा रे पळा असे म्हणतील. असे ३-४ वेळा झाल्यावर शिक्षक छोटी शिट्टी वाजवून एक संख्या म्हणतील. (उदा. ४,६,३) त्या संख्येप्रमाणे गोलातून धावणारे विद्यार्थी आपला गट तयार करून खाली बसतील. ज्यांना संख्येचा गट मिळणार नाही ते विद्यार्थी बाद होऊन गोलामध्ये बसतील. पुन्हा खेळ सुरू करताना बाद झालेले विद्यार्थी डोंगर पेटला घोषणा देतील. (पळा रे पळा, धावा रे धावा.) निर्णय – शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी चांगला धावपटू म्हणून त्याच्या नावाएवढ्या टाळ्या वाजवून त्याचा गौरव करावा.

८. खेळाचे नाव – विषारी विहीर (अग्निकुंड)

साहित्य – चुना, दोरी

वर्गरचना – वर्गाचे १२-१५ जणांचे गट करा. त्यांचा हात धरून गोल करा. त्यांच्या मध्यभागी १ फूट त्रिज्येचे वर्तुळ आखा.

खेळाचे वर्णन – गोलातील विद्यार्थी हात धरून उभे राहतील. गोलाच्या मध्ये एक छोटा गोल आखावा. हीच विषारी विहीर. शिट्टी वाजताच खेळाला प्रारंभ होईल. हात न सुटता दुसऱ्याला विषारी विहिरीत पाडण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा पाय किंवा शरीर या विषारी विहिरीत पडेल तो विद्यार्थी बाद किंवा ज्याचा हात सुटेल तोही बाद होईल. शेवटपर्यंत जो राहील तो विद्यार्थी विजयी ठरेल.

निर्णय – शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी उत्तम संरक्षक म्हणून गौरव करावा.

९. खेळाचे नाव – अचानक लंगडी

साहित्य – चुना, दोरी ‘Outdoor School Games for Kids’

वर्गरचना – संख्येनुसार मोठा गोल किंवा लंगडीच्या मैदानाप्रमाणे ३० फुटांचा चौरस आखावा. सर्वांना क्रमांक द्यावेत. त्यातील ३ जणांना धावण्यास सांगावे.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना गोलात उभे करून त्यांना एकपासून क्रमांक द्यावेत. नंतर सर्वांना गोलात उभे करावे. शिक्षक कोणताही एक क्रमांक घेतील. ज्याचा पुकारलेला नंबर असेल तो विद्यार्थी हात वर करून लंगडीने शिवण्यास सुरुवात करेल. पुढले नंबर पुकारेपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बाद करण्याचा प्रयत्न करावा. लंगडीसाठी पूरक खेळ म्हणून याचा उपयोग करावा.

निर्णय – जास्तीत जास्त बाद करणारा विद्यार्थी “उत्कृष्ट लंगडी” घालणारा म्हणून जाहीर करावा. लंगडीचा संघ आवड, अभ्यास, कौशल्य वाढविण्यासाठी उपयोग करावा.

१०. खेळाचे नाव अचानक कबड्डी

साहित्य – चुना, टेप ‘Outdoor School Games for Kids’

वर्गरचना – ११४८ मीटरचे कबड्डी मैदान आखावे. सर्वांना क्रमांक द्यावेत. सर्वांनी एकदम मैदानात धावावे.

खेळाचे वर्णन याचप्रमाणे कबड्डी कबड्डी असा दम घेऊनही गोलातील विद्यार्थ्यांना आऊट करावे. राज्य असणाऱ्याने आपला दम असेपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बाद करण्याचा प्रयत्न करावा. कबड्डीतील दम घेणे हे कौशल्य वाढविण्यास उपयोग होऊ शकतो.

निर्णय – कबड्डी कबड्डीं असा दम जास्तीत जास्त वेळ घेऊन बाद करणारा विद्यार्थी खेळाडू विजयी म्हणून घोषित करा. कबड्डीमधील “दम घेणे” याचा कौशल्य वाढविण्यास उपयोग करता येऊ शकेल. मैदानाचीही ओळख होईल.

११. खेळाचे नाव माझा भाऊ सापडला.

वर्गरचना – एकामागे एक असे उभे राहतील अशी दोन वर्तुळे करावीत. त्याची जोडी ठरवावी. त्याची तोंडे विरुद्ध दिशेला (दहिने बाय मूड) करून खेळाला प्रारंभ करावा.

खेळाचे वर्णन – एकामागे एक अशा स्थितीत्त विद्यार्थ्यांना दोन गोलात उभे करावे. आतील बाहेरील गोलातील विद्यार्थ्यांची जोडी असेल. नंतर शिक्षक आतील गोलाला आज्ञा देतील. दोन्ही गोलातील विद्यार्थी विरुद्ध दिशेने धावत असतानाच अचानक शिक्षक शिट्टी वाजवतील. त्यानंतर विरुद्ध दिशेने धावणारे विद्यार्थी आपल्या जोडीदार भावाला शोधतील. त्याचा हात धरून दोघेही जण शिक्षकापर्यंत धावत जातील. जी भावांची जोडी पहिली येईल तो विजयी.

निर्णय – भावाला घेऊन निश्चित जागेवर पहिल्यांदा पोहोचणारी जोडी विजयी होईल.

१२. खेळाचे नाव जागा बदला

वर्गरचना – मोठा हात धरून गोल करा. एकावर राज्य द्या. ‘Outdoor School Games for Kids’

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना गोलात उभे करा. सर्वांना क्रमांक द्या. एका विद्यार्थ्याला गोलाच्या मध्ये उभे करा. शिक्षक कोणतेही दोन क्रमांक पुकारतील. ज्या विद्यार्थ्यांचे हे दोन क्रमांक असतील ते विद्यार्थी आपली जागा बदलतील. त्याच वेळी मध्ये उभा राहणारा विद्यार्थी त्याच्यापैकी एकाच्या जागेवर जाऊन उभे राहण्याचा प्रयत्न करील.

निर्णय जागा मिळेपर्यंत त्यानेच राज्य घ्यावे.

१३. खेळाचे नाव अनमोल वस्तू

साहित्य – डंबेल्स, वॉण्डस्, रिंग, चेंडू ‘Outdoor School Games for Kids’

वर्गरचना वर्गाचे चार संख्येनुसार भाग करावेत. त्याचे चार गोल हात धरून करावेत. दोघातील अंतर दोन हातापेक्षा थोडे जास्त असावे. गटांना नावे द्यावीत.

खेळाचे वर्णन – विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दोन किंवा तीन मोठे गोल तयार करावेत. प्रत्येक विद्यार्थ्यांत दोन हातापेक्षा जास्त अंतर ठेवावे. प्रत्येक गोलात एखादी वस्तू (डंबेल्स, वॉण्डस्, रिंग, चेंडू) द्यावी. शिट्टी वाजताच ती अनमोल वस्तू आपल्या उजव्या हाताकडील विद्यार्थ्याकडे नीटपणे द्यावी. ती वस्तू गोलातून प्रत्येक विद्यार्थ्याकडून पुढे जाईल. जेथून खेळाला सुरुवात झाली त्या ठिकाणी ती अनमोल वस्तू परत येईल. ज्या गोलात अनमोल वस्तूची फेरी पहिल्यांदा पूर्ण होईल त्या गोलाचा गट विजयी होईल.

१४. खेळाचे नाव झेलकर कोण (प्रकार १ व २)

साहित्य – एक वॉण्डस् किंवा ६ फूट काठी

वर्गरचना – हात धरून मोठा गोल करा. त्यांना क्रमांक द्यावे.

खेळाचे वर्णन – गोलातील सर्व विद्यार्थ्यांना नंबर द्यावेत. गोल साधारणा ८- १० पावलांचा असावा. मध्यभागी शिक्षक लांब सरळ काठी घेऊन उभे राहतील. काठी सरळ उंच उडवतानाच एखादा नंबर पुकारतील. नंबर पुकारलेला विद्यार्थी काठी जमिनीवर पडायच्या आत धावत जाऊन ती काठी हवेतच झेलण्याचा प्रयत्न करेल.

निर्णय – उडवलेली काठी जमिनीवर पडण्यापूर्वी झेलणारा विद्यार्थी विजयी होईल. काठी वॉण्डस् उडवण्यापेक्षा जमिनीवर उभी धरावी. ती पडण्याच्या आत धावत येऊन काठी धरावी. असाही हा खेळ खेळता येईल.

१५. खेळाचे नाव मी विजयी

साहित्य – चुना, दोरी ‘Outdoor School Games for Kids’

वर्गरचना ५ मीटर त्रिज्येचा गोल आखावा. सर्व विद्यार्थ्यांना हात पाठीमागे बांधून गोलात उभे करावे.

खेळाचे वर्णन – मोठा गोल करून सर्व विद्यार्थ्यांना हात पाठीमागे बांधून आत उभे राहण्यास सांगावे. शिट्टी वाजताच आतील विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला ढकलून गोलाच्या बाहेर घालवून देण्यासाठी झटापट करतील. हात सुटणारा विद्यार्थीही बाद होईल. शेवटपर्यंत जो विद्यार्थी गोलात राहील तो विद्यार्थी विजयी होईल.

१६. खेळाचे नाव – भाऊ, तू कुठे आहेस?

साहित्य – डोळे बांधण्यासाठी २-४ रुमाल

वर्गरचना – मोठा गोल करून वर्गात उभे करा. दोन-दोनच्या जोड्यांच्या डोळ्यांना रुमाल बांधा. एकावर राज्य द्यावे दुसऱ्यास पळण्यास सांगा. ‘Outdoor School Games for Kids’

खेळाचे वर्णन गोलात सर्वांना उभे करावे. त्यातील ६ किंवा ८ विद्यार्थ्यांच्या गटाला गोलात धावण्यासाठी पाठवावे आणि एका विद्यार्थ्याचे डोळे बांधून त्याला गोलातील धावणाऱ्या विद्याथ्यार्थ्यांना पकडण्यास सांगावे. डोळे बांधलेला विद्यार्थी “भाऊ, तू कुठे आहेस” असे विचारील. त्याच वेळी धावणारे विद्यार्थी “मी येथे आहे” म्हणून उत्तर देतील. त्या दिशेने जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा.

निर्णय – जो खेळाडू बाद करील तो विजयी.

१७. खेळाचे नाव – वाघ-शेळी

वर्गरचना – वर्गाचे चार संख्येत समान चार गट करा व हात धरून उभे करा. प्रत्येक गटातील एकाला वाघ, एकाला शेळी ठरवून खेळास प्रारंभ करावा. ‘Outdoor School Games for Kids’

खेळाचे वर्णन – विद्यार्थ्यांना हात धरून उभे राहण्यास सांगावे. त्यातील एका विद्यार्थ्याला गोलाच्या आत उभे करावे. त्याला शेळी म्हणावे. दुसऱ्या विद्यार्थ्याला गोलाच्या बाहेर उभे करावे. तो वाघ असेल. वाघाने शेळीला खाण्याचा प्रयत्न शिट्टी वाजल्यानंतर करावा. हात धरून उभे असणाऱ्यांनी वाघापासून शेळीचे संरक्षण करावे. म्हणजेच शेळीला बाहेर जाण्यास अटकाव करू नये, तर वाघाला हाताचा पिंजरा तोंडून आत किंवा बाहेर जाण्यास मज्जाव करावा. वाघ जेव्हा शेळीला खाण्यासाठी प्रयत्न करील त्यावेळी डरकाळी फोडेल. ‘Outdoor School Games for Kids’

निर्णय – वाघाने शेळीस खाल्ले तर वाघ विजयी, न खाल्ल्यास शेळी विजयी ठरेल.

१८. खेळाचे नाव शेर-बकरी रुमझूम

वर्गरचना – वर्गाचे सारख्या संख्येत चार गट पाडा. त्याचे हात धरून चार कोपऱ्यात चार गोल करा. प्रत्येक गटातील एकावर राज्य द्या. ‘Outdoor School Games for Kids’

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी गोलात हात धरून उभे राहतील. शिक्षक एका विद्यार्थ्याला गोलाबाहेर उभे करून त्याला एका विशिष्ट गोलात हात धरून उभा असलेल्या विद्यार्थ्याला पकडण्यास सांगतील. यावेळी पकडणारा विद्यार्थी गोलाच्या विरुद्ध बाजूला उभा असेल. तो म्हणेल “शेर बकरी”. त्यानंतर गोलातील विद्यार्थी रुमझूम म्हणतील. पकडणारा विद्यार्थी शिवण्यासाठी गोलाच्या बाहेरून धावू लागेल. त्याबरोबर सर्व गोलही त्याच दिशेने धावू लागेल. पकडणाऱ्यांनी दिशा बदलली तर गोलाचीही फिरण्याची दिशा बदलते. पकडणाऱ्याने प्रत्येक वेळी शेर-बकरी म्हणावे व धावावे. गोलातील विद्यार्थ्याने ‘रुमझूम’ म्हणत आपल्या सहकाऱ्याला पकडू न देण्यासाठी गोलाची योग्य ती हालचाल चालू ठेवावी.

निर्णय – शिवणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्यास बाद केले तर तो विजयी.

१९. खेळाचे नाव लोण्याचा गोळा

वर्गरचना – हात धरून मोठा गोल करा. एकाला मध्यभागी राज्य घेऊन उभे करा.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी मोठा गोल करून उभे राहतील. एक विद्यार्थी गोलाच्या मध्यभागी नीट उभा राहील. या विद्यार्थ्याच्या नकळत गोलातील विद्यार्थ्यांनी त्याला शिवण्याचा “लोण्याचा गोळा” खाण्याचा प्रयत्न करावा. यात मध्ये उभा असलेला विद्यार्थी न हलताच चौफेर कमरेतून वळून त्याला बाद करण्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला बाद करील.

निर्णय – लोण्याचा गोळा खाणारा विजयी होईल. ‘Outdoor School Games for Kids’

२०. खेळाचे नाव – डुक्कर-मुसंडी

वर्गरचना मोठा गोल हात धरून करा. तिघांना धावण्यासाठी पाठवावे. एकावर राज्य द्यावे.

खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना गोलात धावण्यास सांगावे. एका विद्यार्थ्याला हात पाठीमागे बांधून गोलात धावणाऱ्या विद्यार्थ्यांना डोक्याने शिवण्यास सांगावे. धावणाऱ्या विद्यार्थ्याला शिवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याचा स्पर्श झाला तर पळणारा विद्यार्थी बाद होईल.

सूचना – गोलातील खेळ खेळताना गोल विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार लहान मोठा शक्यतो चुन्याने किंवा पाण्याने आखावा. नाहीतर विद्यार्थ्यांनाच टोकदार कापड किंवा मजबूत काठीच्या टोकाने गोल आखण्यास सांगावे.

निर्णय डोक्याने अधिकजणांना बाद करणारा विजयी ठरेल. लंगडीची हुलकावणी, तोंडावर चकविणे याचा कौशल्य वाढविण्यास उपयोग होतो. ‘Outdoor School Games for Kids’

Sport News Tags:Sports

Post navigation

Previous Post: Mother’s Day 2024: Date, Significance, History, Celebration, Gift Ideas & More
Next Post: School Games for Kids – वैयक्तिक स्पर्धा

Related Posts

  • Famous Traditional Games for Kids in India: प्रसिद्ध पारंपारिक खेळ Sport News
  • Gilli Danda
    Gilli Danda: The Timeless Joy of a Simple Sport Sport News
  • New Sports Olympics 2024
    New Sports Olympics 2024 Events and News
  • School Games For Kids
    School Games for Kids – वैयक्तिक स्पर्धा Sport News
  • Kabaddi Game
    Kabaddi Game: कबड्डी खेळ Sport News
  • Lagori Seven Stones
    Lagori: The Indian Game of Stones Sport News
  • Home
  • About us
  • Contact us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education (23)
  • Events and News (71)
  • Farming (10)
  • Health & Fitness Tips (22)
  • Lifestyle (22)
  • Motivational Story (18)
  • Sport News (11)
  • Butternut Squash Soup Recipe
    Delightful Butternut Squash Soup Recipe: A Warm Hug for Chilly Days Lifestyle
  • छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपति शिवाजी महाराज Education
  • एक शेतकरी व्यथा
    एक शेतकरी व्यथा Motivational Story
  • Savitribai Phule Jayanti
    Savitribai Phule Jayanti: Speeches, Motivational Quotes Events and News
  • Top 10 Nutrient-Rich Foods
    Top 10 Nutrient-Rich Foods: Fuel Your Body with Health and Vitality Health & Fitness Tips
  • Savitribai Phule
    India’s First Woman Teacher Savitribai Phule Death Anniversary Events and News
  • Career Opportunities in the Field of Arts
    Career Opportunities in the Field of Arts: कला क्षेत्रात करिअरच्या आशादायक संधी Education
  • Rajmata Jijau राजमाता जिजाऊ
    Rajmata Jijau राजमाता जिजाऊ Events and News

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education
  • Events and News
  • Farming
  • Health & Fitness Tips
  • Lifestyle
  • Motivational Story
  • Sport News

We're dedicated to providing you the best of knowledgeable web , with a focus on dependability for human benefit, while also considering ethical, moral and sustainability aspect.

Copyright © 2025 Journey Of Knowledge.

Powered by PressBook News WordPress theme