Dry Skin: ऋतू बदलताना त्वचा कोरडी झाली तर उपाय घरात शोधा, मार्च म्हणजे थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहूल देणारा महिना! या महिन्यात अचानक वारे वाहू लागतात. सकाळी व रात्री चंडी आणि दुपारी मात्र कडक ऊन. वातावरणातील अशा बदलानं ऐन हिवाळ्यात जितकी त्वचा कोरडी झाली नसेल तितकी त्वचा या महिन्यात कोरडी होते. सारखी खात्र येते आणि आपण हैराण होऊन अनेक कॉस्मेटिक्सचा मारा सुरु करतो. पण त्वचा काही फार सुधरत नाही.
आजच्या जगात कॉस्मेटिक इंडस्ट्री फार मोठी आहे. हजारो देशी- विदेशी कंपन्या लाखो प्रकारचे कॉस्मेटिक्स बनवत असतात. पण एवढी उत्पादनं बाजारात असूनही सर्वांची त्वचा निरोगी किंवा सुंदर झाली आहे असं मात्र नसतं. किंबहुना तुमच्या आसपास किंवा दवाखान्यातलं आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतं. कितीही प्रकारची सौंदर्य प्रसाधनं बाजारात असली तरी त्यातलं तुम्हाला योग्य कोणतं? याची माहिती जर नसेल तर आजारापेक्षा उपाय भयंकर अशी अवस्था होते. कॉस्मेटॉलॉजी हे पण शास्त्र आहे. कोणतीही सौंदर्य प्रसाधनं वापरताना त्वचेचा प्रकार, ऋतु, वय, कामाचं स्वरूप अशा अनेक गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. दिवसा आणि रात्री वापरण्याची कॉस्मेटिक्सही वेगळी असतात. पण कोणतंही कॉस्मेटिक्स निवडताना, खरेदी करताना, खरेदीपूर्वी हा विचार आपण करतो का? तज्ज्ञांचा सल्ला घेतो का? हे एवढं तपासून बघितलं तरी उत्तर मिळेल.
त्वचा कोरडी होण्याचं कारण समजून घेतलं तर उपाय करणं नेहमीच सोपं जातं.
Causes of dry skin: त्वचा कोरडी का होते?
आपली त्वचा मुख्यतः दोन प्रकारानं कोरडी होते.
१) ऑइल ड्राय (oil dry) यात त्वचेतील स्निग्धता कमी होते.
२) वॉटर ड्राय (water dry) यात त्वचेतील जलांश (hydration) कमी होतो.
लहान मुलांमध्ये आढळणारा कोरडेपणा किंवा हिवाळ्यातील कोरडेपणा हा ऑइलड्राय प्रकारातील असतो, तर चाळिशीच्या आसपास असणारा कोरडेपणा उन्हाळ्यातील शुष्कता ही शरीरातील जलांश कमी झाल्यामुळे येते.
हे असं का होतं?
त्वचेची काळजी घेताना केलेल्या छोट्या छोट्या चुका हेच त्वचेच्या समस्यांचं मुख्य कारण असतं आपण हातचं बाजूला ठेवून पळत्याच्या मागे धावतो असं बऱ्याचदा म्हणतो, तोच नियम जर त्वचेच्या काळजी घेण्याच्या बाबतीत लावला तर फारस वेगळं आणि महागडं काही करावं किया वापरावं लागणार नाही, योग्य वेळी योग्य काळजी हेच समीकरण सुंदर त्वचेसाठी लागू पडतं. अर्थात त्यासाठी काही नियम पाळावेच लागतात.
त्वचा कोरडी झाल्यास…Remedies
त्वचा कोणत्या कारणानं कोरडी झाली हे तपासून, खात्री करून त्यावर उपाय करावेत. त्वचा जर ऑइल ड्राय झाली असेल तर त्यावर कोल्ड क्रीम्स वापरावे. आणि त्वचा जर वॉटर ड्राय झाली असेल तर पाण्याचा अंश असलेली क्रीम (वॉटर बेस्ड क्रीम) म्हणजेच मॉश्चरायझर किंवा लोशन्स वापरावे. नारळाचे दूध, कच्चं दूध, कोरफड गर, फळांचे गर हे नैसर्गिक उपाय आहेत. यांचा नियमित वापर केल्यास इतर सौंदर्य प्रसाधनांची फारशी गरज भासत नाहीत.
याचप्रमाणे अनेक जण त्वचेचा पोत सुधारण्यासाठी अस्ट्रेजंट किंवा टोनर्स वापरतात. पण यामुळे त्वचेची रंध्रं संकुचित होतात. मात्र ज्यांना घाम येतो किंवा उन्हाळ्याच्या ऋतूत किंवा मुंबईसारख्या आर्द्र ठिकाणी ते नियमित वापरलं तर चालतं. परंतु ज्यांची त्वचा कोरडी आहे, ज्यांना अजिबात घाम येत नाही किंवा कमी येतो त्यांनी टोनर वापरू नये अन्यथा त्वचा अधिकच रुक्ष होते.
चेहरा सुकून जातो तेव्हा..
सुंदर त्वचेसाठी सोपे नियम
■ त्वचेची काळजी घेताना मनात अनेकदा काही गैरसमज असतात. आची ते बाजूला ठेवावे. जसे चेहरा जेवढा रगडून काढू तितकी त्वचा उजळ होते. असं काही नसतं. सारखा सक्रय करून चेहऱ्याच्या त्वचेच्या वरच्या थराला इजा पोहोचते. यासाठी सक्रय हा उपाय आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त तीन वेळा कराया
■ मेकअप केल्यानंतर मेकअप काढावाच लागतो. पण अनेकदा याबाबत कंटाळा केला जातो. पण मग चेहऱ्यावर मेकअप जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेला इजा होते. हे असं वारंवार घडल्यास चेहऱ्याचा त्वचेचा दाह होतो, त्वचेवर पुरळही उठू शकते. यासाठी मेकअप केल्यावर न चुकता मेकअप काढावा. त्यासाठी गुलाब पाणी किंवा टोनर वापरावं
उशांचे कव्हर कोणते वापरतात हा प्रश्नही त्वचेच्या बाबतीत गंभीर आहे. सुती कव्हरवर सुरकुत्या पडतात. त्या चेहऱ्याच्या त्वचेला त्रासदायक ठरतात. सॅटीन किंवा सिल्क कव्हर वापरण सोयिस्कर ठरतं.
■ चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यांसाठी एकच उत्तम उपाय म्हणजे चांगलं सनस्क्रीन वापरणं. 30 रढक्र किंवा त्यापेक्षा जास्त रढक्र असलेलं सनस्क्रीन वापरावं. हे क्रीम चेहऱ्यावर जोरात मसाज करून नव्हे तर हलक्या हातानं लावावं. शिवाय मान आणि हात यावरही हे सनस्क्रीम लावावं.
■ वेगवेगळे स्क्रब वापरले तर तेलकट त्वचेचा प्रश्न सुटू शकतो असं अनेकांना वाटतं, पण हा समजच अंगलट येतो. वेगवेगळे स्क्रब यापरून त्वचेवरचं तेल काढून टाकण्याच्या नादात आपण त्वचेला जास्त तेल निर्माण करायला उद्युक्त करतो. त्यामुळे अती स्क्रब आणि वेगवेगळे सक्रय हा उपाय त्वचेची काळजी घेताना टाळायला हवा.
■ अनेकदा आपण सतत चेहन्याला हात लावतो किंवा चेहऱ्याची त्वचा ओढत राहतो, हे चुकीचं आहे. पण एकदा सवय लागली की हात आपोआपच चेहन्याकडे वळतात. पण ही सवय चेहन्याच्या नाजूक त्वचेचा घात करते.
■ त्वचेच्या अनेक समस्यांचं मूळ हे डोक्यावरच्या केसांमध्येही असू शकतं. केसांसाठी वेगवेगळी तेलं वापरली जातात. कधी कधी त्याचा ओघळ चेहन्याच्या त्वचेवर येऊ शकतो, तर कधी कधी केस सारखे चेहऱ्यावर येतात. केसावरच्या तेलाचा परिणाम मग चेहन्याच्या त्वचेवर होतो. त्यामुळे पुरळ, पुटकुळ्या यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी केस नीट बांधून ठेवावे. ते चेहन्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
■ त्वचेला पुरेसा आराम हवा असतो. आणि हा आराम आपण घेत असलेल्या झोपेवर अवलंबून असतो. पुरेशी झोप झाली नाही तर त्वचेवरही ताण येतो. त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात. पुरेशी झोप हा त्वचेच्या काळजीतला मुख्य नियम आहे.
■ तेलकट त्वचा असली की मॉश्चरायझर टाळण्याकडे कल असतो. पण त्वचा कोरडी असो की तेलकट, त्वचेला पुरेसा ओलसरपणा हवा असतो. हा ओलसरपणा मॉश्चरायझर पुरवत असतो. आपल्या त्वचेसाठीच योग्य मॉश्चरायझर निवडून ते अवश्य वापरावं.
■ आपली त्वचा सांभाळायची असेल तर कडक पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावं. कडक पाणी हे त्वचेमधलं नैसर्गिक मॉश्चरायझर उडवून लावतं. त्यामुळे त्वचा अती कोरडी होते.