Milk दूध खरंच शुद्ध आहे, याची खात्री करून घेता का तुम्ही?

Milk: दूध हा मानवी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते सर्व वयोगटातील लोक सेवन करतात. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा हा एक चांगला स्रोत आहे. दुधामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह यासारखे इतर महत्त्वाचे पोषक घटक देखील असतात. दुधाचे सेवन विविध प्रकारे करता येते. हे ताजे प्यायले जाऊ शकते, स्वयंपाकात वापरले जाऊ शकते किंवा चीज, दही आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये बनवले जाऊ शकते. आईस्क्रीम, चॉकलेट आणि ब्रेड यांसारख्या इतर पदार्थांच्या निर्मितीमध्येही दुधाचा वापर केला जातो.

दूध हे अष्टपैलू आणि पौष्टिक अन्न आहे ज्याचा आनंद जगभरातील लोक घेतात. हे निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते अनेक आरोग्य फायदे प्रदान करू शकतात पण….

Milk दुधात भेसळ होते तेव्हा–

दुधाला आपण पूर्णान मानतो. जे दूध आपण रोज पितो, वाढत्या ययाच्या मुलांना आग्रहानं प्यायला लावतो ते दूध शुद्ध आणि सकसच असतं, असं आपण गृहीत धरतो. पण दुधाबद्दलचं वास्तव मात्र काहीतरी वेगळंच सांगतं.

मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणीत महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला दुधाच्या दर्जाबद्दल खुलासा करायला सांगितलं आहे. त्यात मुंबई ग्राहक पंचायतीनं केलेल्या दूध तपासणीच्या अहवालात आढळलेला दुधाच्या निकृष्ट दर्जाचा! या नमुन्यांपैकी ३० टक्के नमुन्यात भेसळ होती. या ३० टक्क्यांपैकी २५ टक्के नमुन्यात पाणी मिसळलेलं आढळलं, तर पाच टक्के नमुन्यांत युरिया, स्टार्च किंवा साखर हे घटक घातलेले आढळून आले. नामांकित दूध उत्पादकांच्या दुधाचा स्निग्धांश (Fat) आणि इतर घनपदार्थ (SNF) अपेक्षित मानकापेक्षा कमी प्रमाणात असल्याचंही आढळून आलं. जवळजवळ ४६ टक्के नमुने हे त्यापेक्षा कमी प्रतीचे आढळले.

या प्रकल्पात दूध तपासणीची चार माध्यमं वापरली गेली.

■ दुधाची पिशवी काळजीपूर्वक बघणं अणि त्यावरचं लेबल वाचणं.

■ लॅक्टोमीटरनं दुधाची घनता मोजणं.

■ अॅनालायजर (Analyzer) या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्यानं दुधाच्या नमुन्यातील स्निग्धांश, घनपदार्थ, प्रोटीन, पाणी अशा घटकांची माहिती करून घेणं. ‘Milk दूध खरंच शुद्ध आहे’

■ नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) किटच्या साहाय्यानं दुधात स्टार्च, साखर, युरिया, खतं, कीटकनाशकं यांची भेसळ आहे का ते बघणं.

पिशवीतलं दूध..

दूध हे डेअरीचं असो की पिशवीतलं, भेसळ दोन्हीतही होते. त्यामुळे दोन्हीबाबतही सतर्क राहायला हवं.

दुधाची पिशवी काळजीपूर्वक बघावी आणि त्यावरचं लेबल वाचावं.

दुधाची पिशवी सीलजवळ चिकटवलेली आहे, त्यावरची जुळलेले नाहीत अशा काही त्रुटी आढळल्यास लगेच विक्रेत्याला खुलासा विचारावा.

जर विक्रेत्याचं उत्तर समाधानकारक नसेल, तर उत्पादकाशी संपर्क साधावा. उत्पादकाचा संपर्क क्रमांक पिशवीवर लिहिलेला असणं अपेक्षित आहे.

काहीही गडबड आढळल्यास अन्न य औषध प्रशासनाशी (FDA) किंवा अन, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्रालयाशी संपर्क साधावा. ‘Milk दूध खरंच शुद्ध आहे’

दूध तपासणीच्या दहा पायऱ्या

आपल्या घरी येणारी दुधाची पिशवी नित्यनेमाने व बारकाईनं बघावी. या १० गोष्टी तपासायला एक मिनिट लागेल, पण आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी हा एक मिनिट मोलाचा आहे.

■ दुधाची पिशवी आपल्या घरी येईपर्यंत थंड असली पाहिजे.

■ पिशवी हाताळताना तिचा स्पर्श एखाद्या उशीसारखा वाटायला हवा.

■ पिशवीची शिवण दोन्ही बाजूंनी झिगझेंग असावी. कुठेही कापून चिकटवलेली नको.

■ पिशवी मध्यात घट्ट धरल्यावर तिचे चारही कोपरे सशाच्या कानासारखे ताठ उभे राहिले आहेत ना, हे बघावं.

■ उत्पादकाचं/वितरकाचं नाव, पत्ता त्यावर छापलेला हवा.

■ पिशवीवर दुधाचं वजन, उत्पादनाची तारीख, दूध कधीपर्यंत वापरावं ती तारीख हे सर्व लिहिलेलं असलं पाहिजे.

■ दुधाचा प्रकार कोणता, हे लिहिलेलं असावं. उदा. गायीचं, म्हशीचं, टोण्ड, प्रमाणित इ… म्हशीचं दूध ‘B’, गायीचं दूध ‘C’ या आद्याक्षरांनी लिहिलेले असलं तरी चालतं.

■ दुधातील पोषक घटकांची माहिती त्यावर असायला हवी. म्हणजे Fat, SNF इत्यादि.

■ पिशवीवर सर्व करांसह किंमत हवी.

■ पिशवीवर FSSAI नोंदणी हवी.

शासन नियमित दुधातील मानकांचं प्रमाण

गायीच्या व टोण्ड दुधात ३.५ टक्के स्निग्धांश (Fat) व ८.५ टक्के इतर घनपदार्थ (SNF).

म्हशीचं दूध व फुल क्रीम दूध – यांत ६ टक्के स्निग्धांश (Fat) व ९.० टक्के इतर घनपदार्थ (SNF).

डेअरी किंवा गवळ्याकडून दूध

दूध एकाच गोठ्यातून येतं की वेगवेगळ्या ठिकाणचं दूध एकत्र केलं जातं? दूध काढल्यापासून तुमच्यापर्यंत कसं किती वेळानं येतं? दुधाची डिग्री (दर्जा) कशी तपासली जाते? उरलेल्या दुधाचे काय करतात? असे प्रश्न ज्या डेअरीतून किंवा गवळ्याकडून दूध घेतो त्याला विचारायलाच हवेत. ‘Milk दूध खरंच शुद्ध आहे’

डेअरी, गोठा आतून बघावा. त्यासाठी लहान मुलांची क्षेत्रभेट आयोजित करावी. म्हणजे डेअरी, गोठा आतून पाहण्याची, तेथील स्वच्छता, व्यवहार जवळून बघण्याची संधी मिळते.

घरच्या घरी लॅक्टोमीटर (Lactometer) वापरून दुधात पाणी मिसळलेलं नाही ना, हे तपासावं.

दूधाची शुद्धता तपासण्यासाठी खात्री करण्याचे काही उपाय आहेत. तुमच्या घरी येणारं दूध शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी लोकमत न्यूज नेटवर्कच्या या लेखातील ५ सोप्या टिप्स आपल्याला मदत करू शकतात. याचा वापर करून तुम्ही घरातल्या दूधाची शुद्धता तपासू शकता. या लेखात दिलेल्या उपायांमध्ये दूधात पाणी मिसळलेले असल्यास ते ओळखण्यासाठी थेंब वापरावं. त्याची चव थोडी गोड असते आणि त्याचबरोबर बनावट दूधात डिटर्जंट आणि सोडा मिसळला जातो. त्यामुळे भेसळयुक्त दूध कडू होते. या लेखात दिलेल्या उपायांमध्ये दूधात पाणी मिसळलेले असल्यास ते ओळखण्यासाठी थेंब वापरावं. दुधात पाणी मिसळणे हे सर्रासपणे चालणारी पद्धत आहे. दुधात पाणी मिसळले आहे का हे तपासण्यासाठी उतार असलेल्या भागावर दुधाचा थेंब टाकावा. दूध जर शुद्ध असेल तर टाकलेला एक थेंब हळू हळू पांढरी रेषसोडत पुढे जाईल. जर दुधा मध्ये पाणी मिसळले असेल तर दूध कुठल्याही प्रकारची खूणन सोडता पुढे वाहून जाते. आपण या उपायांचा वापर करून आपल्या घरातल्या दूधाची शुद्धता तपासू शकता. ‘Milk दूध खरंच शुद्ध आहे’

दुधाबाबत तक्रार असल्यास..

अन्न व औषध प्रशासन एफ डीए (FDA) महाराष्ट्र हेल्पलाइन क्र. १- ८००-२२२३६५ येथे किंवा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्रालयाची हेल्पलाइन क्र. १-८००-२२२२६२ येथे तक्रार करावी.

नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तिथे जाताना सोबत भेसळयुक्त दुधाचा नमुना, बनावट पिशवी, विक्रेत्याचा तपशील इ. सर्व पुरावे घेऊन जावेत.

पोलिसांनी सहकार्य न केल्यास ‘भारत सरकारचा अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६’ नुसार त्यांनी कारवाई करायला हवी, याची त्यांना जाणीव करून द्यावी.