Skip to content

Journey Of Knowledge

Journey Of Knowledge

  • Home
  • Agriculture
    • Farming
  • Lifestyle
    • Events and News
    • Health & Fitness Tips
    • Motivational Story
  • Sport News
  • Education
  • Toggle search form
  • CBSE बोर्ड परीक्षा 2024: मोठे बदल जाहीर झाले आहेत Education
  • The Art of Self-Development
    The Art of Self-Development स्व-विकासाची कला Lifestyle
  • Conjunctivitis Precaution and Care Health & Fitness Tips
  • पॅरिस ऑलिम्पिक 2024
    पॅरिस ऑलिम्पिक 2024: मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली Sport News
  • Rural Business Ideas: आपल्या गावात हे 5 व्यवसाय सुरू करा आणि दररोज हजारो कमवा
    Rural Business Ideas: आपल्या गावात हे 5 व्यवसाय सुरू करा आणि दररोज हजारो कमवा Farming
  • Farmer and his Son's
    Motivational Story on Farmer and his Son’s for kids शेतकरी आणि त्याच्या पुत्रांवरील नवीन प्रेरणादायी कथा Motivational Story
  • What are some major historical events in India since 1947 Education
  • International Yoga Day 2024
    International Yoga Day 2024: History, Theme, Significance and Celebration Lifestyle
एक शेतकरी व्यथा

एक शेतकरी व्यथा

Posted on January 29, 2025February 17, 2025 By Shubhangi Pawar

“एक शेतकरी व्यथा” हे एक अत्यंत गहन आणि मार्मिक शीर्षक आहे. शेतकऱ्यांची जीवनव्यथा, त्यांचे संघर्ष, त्यांची मेहनत आणि त्यांना मिळणारी कमी सन्मानाची बाबी, हे सगळं खूपच संवेदनशील मुद्दे आहेत.

शेतकऱ्यांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते—प्राकृतिक आपत्ती, कमी भाड्याचं उत्पन्न, कर्जाची चिंता आणि कधी कधी शेतीला मिळणारी कमी किंमत. तरीही त्यांचे परिश्रम आणि आस्थेने केलेलं काम हे आपल्या समाजाच्या पायावर असलेलं अत्यंत महत्त्वाचं आहे.

चला तर जाणून घेऊया एक शेतकरी व्यथा

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि संघर्ष अत्यंत वाणिज्यिक आणि मानवीय दृष्टिकोनातून विचारले तर, त्यात खूप कडवट सत्य आहे. शेतकऱ्यांचा जीवनशैली बहुतेक वेळा अत्यंत कठीण, अनिश्चित आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक असतो. शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तविक चित्र अनेक वेळा समाजाला दिसत नाही, आणि त्यांच्या कष्टांना योग्य मान्यता मिळत नाही. ह्या संघर्षाच्या मागे असलेल्या गोष्टी, त्यांचे जीवन अधिकाधिक संवेदनशील बनवतात. त्यांच्या स्थितीला लक्षात घेऊन, सरकार, समाज आणि शेतकऱ्यांची खरेच काय मदत होऊ शकते यावर विचार करणे आवश्यक आहे.

शेतकरी सशक्तपणे निसर्गाच्या अनिश्चिततेला सामोरे जातो. पाऊस, वादळ, दुष्काळ इत्यादी परिस्थितींचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट होतो. या घटनांमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते, जे त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला संकटात आणते.

रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे.

आज यश मिळेल , उद्या नफा होईल , हे केले तर पान रूंद होतात , ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात , अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारेच ….

रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल , तो आयोग लागू झाला पाहिजे , मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेले भावा , तुमची पोस्ट वाचली आणि कमेंट करावं वाटल , खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे ?’एक शेतकरी व्यथा’
एक एक प्रयोग फेल गेला की , नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकले कळालच नाही.

कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असल तर नांगरट चांगली होते.. ट्रॅक्टर घेतला , शेणखता साठी जनावर केली , शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या – शेळ्या कर्ज काढून घेतली…..

कुणी सांगीतलं
शेततळ काढा ,
कुणी सांगीतलं
ड्रिप करा ,
मिरची लावा ,
कापुस लावा ,
भुईमुंग लावा ,
धान लावा ,
सोयाबिन लावा ,
द्राक्षे लावा ,
केळी लावा ,
डाळींब लावा ,
पपई लावा ,
वांगी लावा ……
सगळे उद्योग थांबले फक्त वाढल ते कर्ज .!!!

सरकार कडून मिळाली सवलत फसवी , दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जस कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते , तसे शेतकऱ्यांना बघण्याची सगळ्यांची दृष्टी ! ‘एक शेतकरी व्यथा’

खतवाला ,
औषधवाला ,
बॅंकवाला ,
सावकार ,
आडत्या ,
साखर कारखानदार ,
दुध संघवाला ,

सगळे शेतकऱ्यांची कापायला येण्या पुरतीच मदत.
शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही. बोकडाला जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे वाटून उड्या मारत जगत असते , आणि शेवटी कळतं , यान आपल्याला का सांभाळले , तसे वेळ गेल्यावर कळत शेतकऱ्याला उत्पादन वाढवायला का सांगीतले ते !
वर्षातून तीन तीन पीके घेऊन, पाणी पाजून पाजून, खत घालून घालून शेती नापीक होते, तरी पण प्रयोग कांही थांबत नाहीत . ज्याला त्याला विचारल तर म्हणतंय घरची शेती आहे, पडीक पाडायची काय ? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते कळतच नाही. खर आहे रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाहीत . 😞 कुणीही बोलायला तयार नाही. ‘एक शेतकरी व्यथा’

शेती ही संस्कृती आहे, असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे.

बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की, तू का ठेवतो छातीवर हात ? तेंव्हा त्याचं उत्तर येते की, बाप जिवंत आहे का ? हे चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात ! ‘एक शेतकरी व्यथा’

भयाण आहे हे सर्व आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने !

शेतीवर कविता करणारे छान जगतात,

शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात,

शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात.

शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत. ‘एक शेतकरी व्यथा’

प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे
त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर ही शोधू दिले जात नाही ….
ही गोष्ट जर सत्य वाटले तर शेअर करा !

Read More: Urban Farming Tips

A New Research to promote agriculture sector

Motivational Story Tags:Sports

Post navigation

Previous Post: २५ जानेवारी २०२५ रोजी ग्रहांचे संरेखन: काही ग्रह आकाशात एका रेषेत दिसतील
Next Post: Union Budget 2025 Live Updates

Related Posts

  • Christmas story for kids
    Christmas story for kids Motivational Story
  • Inspirational Quotes about Learning
    Top 40 Inspirational Quotes about Learning for Students Motivational Story
  • Indian Biographies for Children's
    Indian Biographies for Children’s: A Window to Inspiring Lives Motivational Story
  • Ratan Tata Quotes
    Ratan Tata Quotes: For Success and Leadership Motivational Story
  • Journey of Knowledge: ज्ञानाचा प्रवास Motivational Story
  • Top 10 Motivational Stories on Learning
    Top 10 Motivational Stories on Learning: 10 प्रेरक कथा Motivational Story
  • Home
  • About us
  • Contact us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education (23)
  • Events and News (71)
  • Farming (10)
  • Health & Fitness Tips (22)
  • Lifestyle (22)
  • Motivational Story (18)
  • Sport News (11)
  • राजवर्धन सिंह राठोड Education
  • Ram Navami
    Ram Navami: Inspirational Quotes, Messages, Significance and Celebration Events and News
  • Thanksgiving Harvest Salad
    Delicious Thanksgiving Harvest Salad Recipe: A Bounty of Flavors Health & Fitness Tips
  • Union Budget 2025 Live Updates Events and News
  • health benefits of drinking Kangen Water
    What are the Health Benefits of Drinking Kangen Water Health & Fitness Tips
  • Top 10 Nutrient-Rich Foods
    Top 10 Nutrient-Rich Foods: Fuel Your Body with Health and Vitality Health & Fitness Tips
  • भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला झाले तरी काय? Health & Fitness Tips
  • Innovative Teaching Methods
    Exploring Innovative Teaching Methods Education

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education
  • Events and News
  • Farming
  • Health & Fitness Tips
  • Lifestyle
  • Motivational Story
  • Sport News

We're dedicated to providing you the best of knowledgeable web , with a focus on dependability for human benefit, while also considering ethical, moral and sustainability aspect.

Copyright © 2025 Journey Of Knowledge.

Powered by PressBook News WordPress theme