उतारवयातील सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय

समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय: आयुर्वेद वृद्धत्वासाठी सर्वांगीण दृष्टीकोन देते, संतुलन राखण्यावर आणि रोग टाळण्यावर लक्ष केंद्रित करते. येथे काही सामान्य वृद्धत्व समस्या आणि संभाव्य आयुर्वेदिक उपायांवर एक नजर आहे: वृध्दावस्था सुखकर होण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे वृध्दावस्थेचा मनापासुन स्वीकार करणे उगाच खोट्या भ्रमात राहु नये दुसरे म्हणजे वृध्दावस्था ही विरक्ती नव्हे हे लक्षात ठेऊन याचा आनंद उपभोगण्यास शिकावे. चला तर बघू या काही सामान्य समस्या आणि त्यावरील काही उपाय.

सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय

उत्तार वयात वाताचा प्रकोप वाढतो, त्यामुळे वातकारक पदाथीचे सेवन टाळावे

वृध्दावस्था लवकर न येण्यासाठी नियमीतपणे आवळा, दालचिनी चूर्ण, पुनर्नवा चूर्ण, पचकर्म यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

रक्तदाब, मानसीक विकार टाळण्यासाठी ‘ब्राम्ही चूर्ण’, ‘सर्पगंधा चूर्ण, प्राणायाम यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा.

लघवीत जळजळ, बहुमुत्रता यासाठी ‘चंद्रप्रभा वटीचा‘ वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

125 ते 250 मिलीग्रॅम शुध्द शिलाजीतचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

ब्राम्ही चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, आवळा चूर्ण समप्रमाणात घेऊन रोज एक चमचा, वैद्यकीय सल्ल्याने ध्यावे.

धुमपान, तंबाखु व अल्कोहोलाचे सेवन अति प्रमाणात करू नये.

पाय दुखणे, थकवा, सांधेदुखी यासाठी आहारातील क्षाराचे प्रमाण कमी करावे, आपल्या चपला/बुट चुकीच्या पध्दतीचे नाहीत याची खात्री करून घ्यावी ‘वसंतकुसुमाग्रज’ ‘महानारायण तेल गुग्गुळ याचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू यावर ‘त्रिफळा चूर्ण, मध, गोमुत्र यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा

दम लागणे या विकारावर फुगे फुगवणे, प्राणायाम, ‘सितोपलादी चूर्ण’, ‘लेडी पिपरी चूर्ण’ याचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा. ‘सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय’

कानांच्या समस्यांसाठी बिल्व तेल’, ‘ओवा, लसुण टाकुन गरम केलेल्या तेलाचा वै‌द्यकीय सल्ल्याने वापर करावा

सूज, प्रोस्टेट यधीच्या समस्यासाठी मक्याच्या कणसाच्या केसांचा काढा वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा

वात विकारांवर ‘दशमुलारीष्ट हे औषध वैद्रद्यकीय सल्ल्याने वापरावे. तसेच एक कप उकळत्या दुधात पाव चमचा हळद व सहा मनुका टाकून रात्री प्राशन करावे

पोट फुगणे, पोट वाढणे, अपचन इत्यादी समस्यावर, आहारात लसणाच्या कच्या पाकळ्या, ओवा याचा समावेश करावा, पोटावर टर्किश टॉवेलच्या गरम/थंड पट्ट्या ठेवाव्यात, आहारातील मीठ, साखर व तेलाचे प्रमाण किमान ठेवावे. जेवणानंतर शतपावली, दुपारची झोप न घेणे हे प्रयोग करावे.

स्मृतीभ्रंशावर ‘ब्राम्ही’, शिरोधारा यांचा वैद्यकीय सल्ल्याने वापर करावा. ‘सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय’

निद्रानाश असल्यास लेखन, वाचन यावर लक्ष केंद्रीत करावे. पायाच्या तळव्यांना रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मसाज करावा. दुपारी झोप घेऊ नये. आहारात दूध, तीळ, खूँसखस, जायफळ याचा समावेश करावा.

वृध्दापकाळी शरीर वातप्रधान असते त्यामुळे रोज तीळाच्या तेलाने मसाज करावा. तुमच्या जीवनात तुम्ही घेतलेले अनुभव अमूल्य आहेत त्यांचा उपयोग तरुण पिढीसाठी करण्याचा प्रयत्न करावा. नोकरी/व्यवसायातील विशेष अनुभव लिहुन काढावेत, त्यांचा उपयोग इतरांना होऊ शकतो.

सर्वसाधारण दिनचर्या आणि आहार:

दिनचर्या:

सकाळी लवकर उठणे निरोगी राहण्यासाठी महत्वाचे आहे. सूर्योदय ते 7:00 पर्यंत उठण्याचा प्रयत्न करा.

दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, योगासने यांसारख्या व्यायामाचा समावेश करा. ‘सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय’

पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये फळे, दूध, धान्य, अंडी, इत्यादींचा समावेश करा.

दिवसभरात पुरेसे काम करा. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे काम करा.

दुपारच्या जेवणात तांदूळ, डाळ, भाजी, आणि पापड यांचा समावेश करा.

संध्याकाळी थोडा व्यायाम किंवा फिरायला जाणे चांगले.

रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा.

रात्री 8 ते 9 तास झोपणे आवश्यक आहे.

आहार: आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज असते. आपण घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. तसेच त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. ‘सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय’

दररोज आहारामध्ये फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे.

तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, इत्यादी धान्य खाणे आवश्यक आहे.

डाळ, मटार, मसूर, इत्यादी कडधान्ये खाणे आवश्यक आहे.

दूध, दही, पनीर, इत्यादी दुग्धजन्य पदार्थ खाणे आवश्यक आहे.

मासे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.

तेल कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

साखर आणि मीठ कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

पाणी: दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

निरोगी राहण्यासाठी सर्वसाधारण टिप्स:

नियमित व्यायाम: नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. ‘सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय’

संतुलित आहार: आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते.

पुरेशी झोप: थकवा आणि चिंता कमी करते.

तणाव व्यवस्थापन: योग, ध्यान, श्वास घेण्याच्या तंत्राचा वापर.

डॉक्टरांचा सल्ला: योग्य निदान आणि उपचार मिळवण्यासाठी.