Skip to content

Journey Of Knowledge

Journey Of Knowledge

  • Home
  • Agriculture
    • Farming
  • Lifestyle
    • Events and News
    • Health & Fitness Tips
    • Motivational Story
  • Sport News
  • Education
  • Toggle search form
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) मध्ये बदल: विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या वर्षांपासून मेजर विषय निवडता येतील Education
  • Zero Budget Natural Farming (ZBNF)
    Zero Budget Natural Farming (ZBNF) Farming
  • Mahaparinirvan Din
    6th December Mahaparinirvan Din: A Day of Spiritual Reflection and Celebration Events and News
  • Knowledge and Nature
    Knowledge and Nature ज्ञान आणि निसर्ग Motivational Story
  • Indian Education System
    Indian Education System In-Depth Look Education
  • Journey of Human
    What was the Journey of Human Towards Knowledge? Education
  • Outdoor School Games for Kids
    20 Outdoor School Games for Kids (गोलातील खेळ) Sport News
  • Top 10 Nutrient-Rich Foods
    Top 10 Nutrient-Rich Foods: Fuel Your Body with Health and Vitality Health & Fitness Tips

RTE Admission 2024 साठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध, पुढील आठवड्यात विद्यार्थी नोंदणी सुरू

Posted on April 4, 2024August 13, 2024 By Shubhangi Pawar

RTE Admission 2024: शिक्षण विभागाने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांनुसार, पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

RTE Admission 2024

RTE Admission 2024

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रिये संदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिध्द केल्या आहेत. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठी (RTE Admission) इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावरील अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर स्वंयअर्थसहाय्यीत शाळेचा पर्याय विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. परिणामी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांचे खाजगी शाळेमधील आरटीई प्रवेशाचेद्वार बंद झाले आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.दारम्यान, आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू केली जाणार आहे. ‘RTE Admission 2024’

महत्त्वाचे मुद्दे: पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरवर्षी, महाराष्ट्र शिक्षण विभाग कमी श्रीमंत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा राखून ठेवतो. याचा अर्थ असा आहे की आर्थिक अडचणी या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, वाहतूक, गणवेश आणि बरेच काही यासह दर्जेदार शिक्षण घेण्यापासून रोखणार नाहीत. तुम्हाला स्वारस्य असल्यास, तुम्ही RTE महाराष्ट्र प्रवेश २०२४-२५ साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अधिकृत पोर्टलमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील आहेत.

2024-25 चे महाराष्ट्र RTE प्रवेश सुरू होणार आहेत. तुम्हाला तुमच्या पाल्याला शिक्षण अधिकाराचा लाभ मिळावा असे वाटत असल्यास, तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोण पात्र आहे याची माहिती तेथे मिळू शकते.

नोंदणीची तारीख:

  • पहिली लाट: ११ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४
  • दुसरी लाट: १५ मे ते ३१ मे २०२४

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्याची जन्मतारीख प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचा दाखला
  • पालकांचे आधार कार्ड

अर्ज करण्याची पद्ध

  • RTE महाराष्ट्राच्या वेबसाइटवर जा: student.maharashtra.gov.in.
  • मुख्य पृष्ठावरील ‘ऑनलाइन अर्ज’ वर क्लिक करा.
  • आरटीई महाराष्ट्र प्रवेशासाठी लिंक शोधा.
  • ‘ऑनलाइन अर्ज करा’ वर क्लिक करा.
  • अर्ज अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • OTP सह तुमचे तपशील सत्यापित करा.
  • समाप्त करण्यासाठी ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज नोंदणीकृत असल्याची पुष्टी तुम्हाला मिळेल.
  • भविष्यातील वापरासाठी तुमचा ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड जतन करा.
  • ऑनलाईन: आरटीई पोर्टल: RTE Portal
  • ऑफलाईन: जवळच्या शाळेत

आरटीई कायद्यात झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता.मात्र, आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठेवला आहे. आता विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळा ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करावयाची असल्यास पालकाच्या प्राधान्य क्रमानुसार संबंधित शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा ,शासकीय शाळा ,स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल आणि एक किलोमीटरच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीतच त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाईल,असे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ‘RTE Admission 2024’

अपवादात्मक परिस्थिती विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर शासकीय , अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर तीन किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळेत प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. आरटीई प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा, नगरपंचायतीच्या शाळा, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि शेवटी स्वंयअर्थसहाय्यीत याच शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्यांक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत. आरटीई प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यासाठी मानवी दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेला आहे. ‘RTE Admission 2024’
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच आरटीई प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केला असल्यास संबंधित बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल,असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘RTE Admission 2024’

आरटीई प्रवेशाबाबत शाळांचे प्राधान्यक्रम कसे असतील याबाबतची माहिती शिक्षण विभागाने प्रसिध्द केली आहे.पुढील आठवड्यात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. ‘RTE Admission 2024’

Education Tags:Education, News, RTE Admission

Post navigation

Previous Post: Exploring Innovative Teaching Methods
Next Post: World Health Day 2024

Related Posts

  • PhD Admission
    PhD Admission Now Based on NET Score (पीएचडी प्रवेशासाठी आता NET स्कोअर आवश्यक) Education
  • Top Universities in the world
    Top Universities in the World for 2024 Education
  • Internationalization of Higher Education
    Internationalization of Higher Education: Benefits and Challenges उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण: फायदे आणि आव्हाने Education
  • भारताची शिक्षण व्यवस्था Education
  • छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपति शिवाजी महाराज Education
  • Journey of Human
    What was the Journey of Human Towards Knowledge? Education
  • Home
  • About us
  • Contact us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education (23)
  • Events and News (71)
  • Farming (10)
  • Health & Fitness Tips (22)
  • Lifestyle (22)
  • Motivational Story (18)
  • Sport News (11)
  • Paper Airplane
    How to Make a Paper Airplane Lifestyle
  • Valentine's Day 2024
    Valentine’s Day 2024: Wishes, Messages for sharing to Loved One Events and News
  • नेमकं जगावं कस ? Motivational Story
  • Guru Purnima 2024
    Guru Purnima 2024: Messages, Wishes, Quotes and Greetings Events and News
  • Hiroshima Day: Remembering the Tragic Day That Changed History हिरोशिमा दिवस Events and News
  • Urban Farming Tips: Growing Food in Small Spaces Farming
  • International Women's Day 2024
    International Women’s Day 2024 : Theme, Significance and Celebrations Events and News
  • Maharashtra Agriculture Day 2024
    Maharashtra Agriculture Day 2024: Date, History, Significance, Celebration & more Events and News

Recent Posts

  • Amazon Great Summer Sale 2025: Key Details and Highlights
  • World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल २०२५
  • २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन
  • What are the Health Benefits of Drinking Kangen Water
  • Kangen Water: A Comprehensive Analysis

Categories

  • Education
  • Events and News
  • Farming
  • Health & Fitness Tips
  • Lifestyle
  • Motivational Story
  • Sport News

We're dedicated to providing you the best of knowledgeable web , with a focus on dependability for human benefit, while also considering ethical, moral and sustainability aspect.

Copyright © 2025 Journey Of Knowledge.

Powered by PressBook News WordPress theme