School Games for Kids: जेव्हा शालेय खेळांचा विचार केला जातो तेव्हा वैयक्तिक स्पर्धांना विशेष स्थान असते. ते केवळ शारीरिक आरोग्याला प्रोत्साहन देत नाहीत तर मानसिक लवचिकता आणि वैयक्तिक वाढ देखील वाढवतात. वैयक्तिक खेळांवर लक्ष केंद्रित केल्याने मुलांना त्यांची शक्ती शोधता येते, वैयक्तिक उद्दिष्टे ठरवता येतात आणि आत्मविश्वास आणि चारित्र्य निर्माण करणारे टप्पे गाठता येतात.
School Games for Kids शालेय खेळांमधील वैयक्तिक स्पर्धांचे फायदे
वैयक्तिक शालेय खेळांमध्ये गुंतल्याने अनेक फायदे मिळतात. सर्वप्रथम, हे खेळ शारीरिक विकास वाढवतात. पोहणे, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक इव्हेंट्स सारख्या खेळांमध्ये चपळता, सामर्थ्य आणि सहनशक्ती आवश्यक असते, ज्यामुळे एकूणच फिटनेस वाढतो. वैयक्तिक स्पर्धांमुळे मानसिक कणखरताही निर्माण होते.
जेव्हा मुले एकट्याने स्पर्धा करतात तेव्हा त्यांना आव्हानांचा सामना करावा लागतो, रणनीती बनवायला शिकतात आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करतात. ते दबाव हाताळण्यात पारंगत होतात, हा एक गुण आहे जो जीवनात अमूल्य आहे. शेवटी, या स्पर्धा वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देतात. मुले शिस्त, वचनबद्धता आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व जाणून घेतात. ते वैयक्तिक उद्दिष्टे ठरवतात आणि ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो.
School Games for Kids
या लेखामध्ये एकूण १० खेळाचे (School Games for Kids) समावेष केलेले आहे खालील खेळांचा शाळेत स्पोर्ट्स तासिका मध्ये घेता येतील. त्याचबरोबर शाळांमध्ये वैयक्तिक खेळांचा सतत सराव करून घेतल्याने मुलांना व्यस्त आणि उत्साही ठेवता येते.
१. खेळाचे नाव – काठी मिळवा
साहित्य – वॉण्डस, काठी, चुना
वर्गरचना – वर्गाचे दोन गट पाडा. त्यांना क्रमांक द्या. दोन्ही गटात १५ मीटर अंतर ठेवा. मध्यभागी एक मोठी रेषा आखा. त्याच्या दोन्ही बाजूला १ मीटरवर दोन लहान रेषा आखा. मध्यभागी आडवी काठी/वॉण्डस ठेवा.
खेळाचे वर्णन – दोन सारख्या उंचीचे किंवा वजनाचे विद्यार्थी प्रतिस्पर्धी म्हणून मध्यभागी उभे करा. मध्ये रेष आखून त्याच्या दोन्ही बाजूला १ मीटर वर आणखी एक एक रेषा आखा. वॉण्डस किंवा काठी मध्य रेषेवर ठेवा. शिक्षकांच्या पहिल्या शिट्टीवर दोन्ही स्पर्धक मध्य रेषेवर आपला डाव पाय ठेवून उजवा पाय मागे पहिल्यासारखा ठेवतील. काठी/वॉण्डस मध्यभागी रेषेला समांतर आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरतील. ही झाली ‘तयार’ ची स्थिती. नंतर शिक्षक पुन्हा एक लांब एक आखूड अशी स्पर्धा-आरंभ शिट्टी वाजवतील. त्यानंतर दोन्ही स्पर्धक काठी वॉण्डससह आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्या मागील रेषेपर्यंत खेचून आणण्याचा प्रयत्न करू लागतील. जे स्पर्धक मागील रेषेपर्यंत खेचून आणू शकतील ते विजयी. ज्या स्पर्धकाच्या हातून काठी/वॉण्डस सुटेल तो स्पर्धकही हारला म्हणून जाहीर केला जाईल. साधारणपणे तीन वेळा ही स्पर्धा घ्यावी. यात दोन वेळा जो स्पर्धक विजय होईल तो विजयी घोषित करावा. या खेळात काठी/वॉण्डस नसल्यास दोन्ही स्पर्धकांची फुगडीसारखी हाताची पकड करावी.
निर्णय – विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्या गटात अधिक असेल तो गट विजयी होईल.
२. खेळाचे नाव – भस्मासुर
वर्गरचना – गोल करावा किंवा दोन गट पाडून त्यांना क्रमांक द्या व क्रमांक- पुकारून त्या दोघांत खेळ घ्यावा खेळाचे वर्णन दोन विद्यार्थी प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर येतील. एक शिट्टी वाजताच त्यांनी कोणत्याही एका हाताची मूठ वळवून पाठीवर ठेवावी. दुसरा हात मोकळाच असेल. पुढल्या शिट्टीला खेळ प्रारंभ करावा. यावेळी दोन्ही स्पर्धक आपल्या मोकळ्या हाताने प्रतिस्पर्धाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करेल. ज्याचा हात प्रथम डोक्यावर नीट ठेवला जाईल तो बाद. त्याने हात ठेवला तर भस्मासुर होईल. हाच खेळ शिवाशिवीसारखाही खेळता येईल. एका विद्यार्थ्याला भस्मासुर करा. त्याने अन्य धावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हाता ठेवून ठरवून दिलेल्या वेळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करावा. ‘School Games for Kids’
निर्णय – शेवटपर्यंत विजयी होणारा, विद्यार्थी ‘भस्मासुर’ गौरवावा.
३. खेळाचे नाव – बैलाची झुंज
साहित्य – चुना, दोरी, टेप
वर्गरचना – ३० मीटर व्यासाच्या गोलात सर्व विद्यार्थ्यांना उभे करावे. सर्वांनी आपल्या हाताने घोट्याजवळ पाय पकडून उभे राहावे.
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या गोलात उभे करा. शिट्टी वाजल्यावर सर्वांनी आपल्या हातानी पायाच्या घोट्याजवळ पुढून किंवा मागून पकडावेत. ही झाली बैलाची स्थिती. पुढल्या शिट्टीला आपल्या प्रतिस्पर्ध्याला खांद्याने, डोक्याने दुशी मारून खाली पाडावे किंवा त्याचे हात सुटतील अशा प्रकारे त्याला धडक मारावी. हात सुटणारे खाली पडणारे विद्यार्थी बाद होतील. शेवटपर्यंत खेळणारा विद्यार्थी ‘विजयी’ ठरेल.
निर्णय – शेवटपर्यंत राहणारा विद्यार्थी विजयी ठरवावा.
४. खेळाचे नाव – कांगाल उडी
वर्गरचना – सर्वांना गोलात उभे करावे. दोन विद्यार्थ्यांत दोन हातापेक्षा जास्त अंतर असावे.
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना गोलात उभे करा. त्यांना नंबर द्या. नंतर त्यांच्या दोघात दोन हातापेक्षा जास्त अंतर राहील एवढे मागे न्या. नंतर क्रमांकाने एक एक विद्यार्थ्याने आपला क्रमांक पुकारून जास्तीत जास्त लांब उडी मारावी की ज्यामुळे त्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला सहजतेने हात लावून बाद करता येईल.
उडी कोणत्याही दिशेला मारावी. उडी दोन्ही पाय जुळवूनच मारावी. स्पर्धकांना बाद करण्याच्या दृष्टीने उडी मारावी. तसेच आपणही बाद होणार नाही याचीही यावेळी काळजी घ्यावी. नाबाद विद्यार्थी विजयी होईल.
निर्णय – शेवटपर्यंत बाद न होणारा विद्यार्थी विजयी होईल. ‘School Games for Kids’
५. खेळाचे नाव – हनुमान उडी
वर्गरचना – सर्व विद्यार्थ्यांना एक हातापेक्षा अधिक अंतर देऊन एका सरळ रेषेत उभे करावे.
खेळाचे वर्णन – या खेळात सर्व विद्यार्थ्यांना योग्य अंतर घेऊन एकाच ओळीत उभे करावे. दोन्ही पायांवर नीट उभे रहावे. शिट्टी वाजल्यानंतर विद्यार्थ्यांनी हाताला योग्य तेवढा झोका घेऊन दोन्ही पायांच्या साहाय्याने जास्तीत जास्त लांब उडी मारण्याचा प्रयत्न करावा. सर्वात लांब उडी मारणारा विद्यार्थी विजयी ठरेल.
निर्णय – सर्वात जास्त लांब उडी मारणारा विद्यार्थी विजयी ठरवावा.
६. खेळाचे नाव – लंगड झेप
वर्गरचना – सर्व विद्यार्थ्यांना योग्य अंतर देऊन एका रेषेत उभे करावे.
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना योग्य अंतर घेऊन एका सरळ रेषेवर उभे करावे. पहिल्या शिट्टीनंतर सर्व विद्यार्थी स्पर्धक आपला कोणताही एक पाय वरती लंगडीसारखा उचलून उभे राहतील. दुसऱ्या शिट्टीनंतर प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार एकाच पायावरून जास्तीत जास्त लांब उडी मारण्याचा प्रयत्न करावा. उडी मारल्यानंतरच त्यांनी लंगडीचा पाय टेकवावा. वरील तिनही प्रकारच्या उड्या जोडून घेतल्यास विद्यार्थ्यांना “तिहेरी उडी” ट्रिपल जंप द्या. स्पर्धेची माहिती होऊ शकेल. यावेळी वाळूच्या खड्याचाही उपयोग करावा.
निर्णय – लांब उडी नियमाप्रमाणे मारणारा विद्यार्थी विजयी ठरेल. ‘School Games for Kids’
७. खेळाचे नाव – तीन पायांनी धावा
साहित्य – दोरी, चुना, टेप
वर्गरचना – सर्व विद्यार्थ्यांना एक रेषेवर उभे करा. त्यांचेपासून ५ मीटरवर दुसरी रेषा आखा.
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थ्यांना योग्य अंतर घेऊन एका सरळ रेषेत उभे करावे. त्यांचेपासून साधारण ५ मीटर अंतरावर तेवढीच रेषा आखावी. पहिल्या शिट्टीला सर्व स्पर्धक आपले दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर पुढे ठेवतील. कोणताही एक पाय वर करतील व धावण्यासाठी तयार होतील. दुसऱ्या शिट्टीनंतर स्पर्धक दोन हात एक पाय जमिनीवर ठेवलेल्या स्थितीत समोरील रेषेपर्यंत धावत जातील. यावेळी स्पर्धकाने वर केलेला पाय तसाच स्पर्धा संपेपर्यंत ठेवावा. पहिले तीन क्रमांक घ्यावेत.
निर्णय – सर्वात रेषेपर्यंत धावत येणारा पहिला स्पर्धक विजयी ठरवावा.
८. खेळाचे नाव – बेडूक उडी
वर्गरचना – सर्व विद्यार्थ्यांना एका ओळीत उभे करा. ‘School Games for Kids’
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी योग्य अंतर घेऊन एका रेषेत उभे राहतील. पहिली शिट्टी वाजल्यावर स्पर्धक चवड्यावर बसतील. दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेवतील. स्पर्धा प्रारंभाची शिट्टी वाजताच सर्व विद्यार्थी बेडकाप्रमाणे उड्या मारीत पाच मीटरवरील रेषेपर्यंत जातील. पहिल्या तीन क्रमाकांची नावे घ्यावीत. त्यांचा जयजयकार सर्वांनी मिळून करावा.
निर्णय – लांब उडी मारणारा बेडूक विजयी म्हणून घोषित करा.
९. खेळाचे नाव – पोलीस आणि चोर
साहित्य – चुना, दोरी
वर्गरचना – १० मीटर व्यासाच्या गोलावर विद्यार्थ्यांना उभे करा.
खेळाचे वर्णन – सर्व विद्यार्थी मोठ्या गोलात दोन हातापेक्षा अधिक अंतर घेऊन बाये, दहिने मूड करून उभे राहतील. प्रारंभाची शिट्टी वाजल्याबरोबर एका स्पर्धकाने धावत जाऊन आपल्या पुढील स्पर्धकाला शिवण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळी आपल्यामागून धावणारा स्पर्धकही आपणास शिवणार नाही असे बघावे. ज्याला आपण शिवू तो चोर असेल व आपण पोलीस. शेवटपर्यंत धावणारा स्पर्धक चोर असेल तो विजयी होईल.
निर्णय – शेवटपर्यंत धावणारा चोर विजयी होईल. ‘School Games for Kids’
१०. खेळाचे नाव – वाल्याची खिंड
साहित्य – दोरी, चुना, टेप
वर्गरचना – १ मीटर लांब व अर्धा मीटर रुंद अशा चौरसासमोर सर्वांना उभे करा. एका विद्यार्थ्याला या चौरसात ‘वाल्या’ म्हणून ठेवा.
खेळाचे वर्णन – एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंदीचा चौकोन आखावा. ही झाली कोळ्याची जागा, त्यात एका विद्यार्थ्याला ‘वाल्या कोळी’ म्हणून राज्य द्यावे. शिट्टी वाजल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी या खिंडीतूनच रस्ता पार करून पलीकडे जावे. यावेळी “वाल्या” आपल्या ताकदीनुसार एक दोघांना पकडून ठेवील. तेही नंतर वाल्याचा साथीदार बनून त्याला मदत करतील. शेवटपर्यंत जो राहील तो विजयी ठरेल किंवा बाद होणारा स्पर्धक बाहेर बसेल.
निर्णय – शेवटपर्यंत पकडला न जाता खिंड पार करणारा विजयी ठरेल.
११. खेळाचे नाव – टांगमारी (पायाने शिवणे)
वर्गरचना – १० मीटर व्यासाचे वर्तुळात किंवा लंगडीच्या चौकोनात सर्व विद्यार्थ्यांना धावण्यासाठी उभे करावे. एकावर शिवण्यासाठी राज्य द्यावे. शिवणाऱ्या विद्यार्थ्याने दोन्ही हात व एक पाय जमिनीवर टेकवून धावणाऱ्यांना हवेत असणाऱ्या पायाने शिवावे. शिवणाऱ्यांचेही क्रमांक द्यावेत. ‘School Games for Kids’
खेळाचे वर्णन – शिक्षकांनी शिट्टी वाजविल्यावर शिवणाऱ्यांनी दोन हात एक पाय जमिनीवर ठेवून धावणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवावे. शिवताना त्यांनी पायानेच धावणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवावे. ज्या विद्यार्थ्यांच्या शरीराला कुठेही शिवणाऱ्याला पाय लागेल तो बाद होईल. किंवा जो धावणारा विद्यार्थी मैदानाच्या सीमारेषेबाहेर जाईल तो बाद होईल.
निर्णय – जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करील तो खेळाडू विजयी. विजयी खेळाडूचा सर्वांनी जयजयकार करावा.
वैयक्तिक शालेय खेळ शारीरिक ते वैयक्तिक वाढ, लवचिकता आणि चारित्र्य निर्माण करण्याचे व्यासपीठ आहेत. मुलांना या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केल्याने त्यांच्या जीवनावर कायमस्वरूपी सकारात्मक परिणाम होऊ शकतात. योग्य समर्थन आणि संसाधने प्रदान करून, आम्ही त्यांना मैदानावर आणि मैदानाबाहेरही भरभराट होण्यास मदत करू शकतो. ‘School Games for Kids’