भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला झाले तरी काय: हा प्रश्न खूप महत्त्वाचा आणि समर्पक आहे – “भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला झाले तरी काय?” यामागे कदाचित अस्वस्थता, चिंता, किंवा निराशा आहे, आणि ती अनेक कारणांमुळे असू शकते. खाली काही मुद्दे दिले आहेत जे सध्या भारताच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पैशाचा मोहा पायी खूप मोठे कारस्थान चालू आहे.
भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला झाले तरी काय?
भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे ९ मार्च २०१६ ला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे
झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी.
महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )
मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे
एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?
अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)
इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे
भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो
इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते
मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते
‘हॉस्पिटल रेफरल स्कॅम’ हा तर सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणार प्रकार आहे. आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला एडमिट होण्यास सांगतात. अपोलो, फोर्टिस, अपेक्स इ. अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात. असे हॉस्पिटल्स डॉक्टर साठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक ४० रुग्ण पाठविण्यासाठी एक लाख रुपये, ५० रुग्णासाठी दीड लाख रुपये, ७५ रुग्णासाठी अडीच लाख रु. देण्याचे लिखित स्वरुपात जाहीर केले होते. रुग्णाला काही झालेले असो अगर नसो फक्त रुग्ण पाठविण्याची रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यात जमा केली जाते
‘डायग्नोसिस स्कॅम’ हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे. बंगुलुरू येथील काही नामांकित पेथोलॉजी LABS वर इन्कम TAX विभागाच्या धाडीमध्ये अनेक LABS कडे १०० कोटीच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते. पुढे असे आढळून आले की, डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते. रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअप साठी पाठवितात. तिथून त्यांना ४०–५०% कमिशन मिळते. जबरदस्ती केलेल्या या चेकअप मधील १ ते २ तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात. हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे. त्यामुळेच देशात सुमारे दोन लाखाच्या वर LABS कार्यरत आहेत. परंतु यातील फक्त एक हजारावर LABS प्रमाणित आहेत
असाच एक मोठा स्कॅम फार्मा कम्पन्या सुद्धा चालवितात. देशातील २० ते २५ मोठमोठ्या औषधी कम्पन्या डॉक्टरांवर एक-एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात. डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जगजाहीर झाले आहे. डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश, विदेश दौरा, पंचतारांकित हॉटेलमध्ये ५ ते ७ दिवसांचे वास्तव्य ई. USV LTD. कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला ३ लाख रु. कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देते
हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्याचे एक वेगळे स्कॅम आणखी आहे. अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी, सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात. त्यावर MRP मात्र प्रचंड असते. इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे. EMCURE कंपनी आपले टेमीक्युअर हे कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना १९५० रुपयांना देते. हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे १८६४५ रुपये वसूल करतात. यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत. (इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट)
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, MCI नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे
देशातील डॉक्टर MCI च्या नियमांची रोज पायमल्ली करतात, परंतु याची जनतेला कल्पना नसते
उदा
👉१. डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रान्डेड औषध लिहायचे नसून साल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे
👉२. क्लाॅज १.८ नुसार उपचार करण्या आधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे. इ. अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते
👉३. तपासण्या आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्विकृती घेणे आवश्यक आहे
👉४. प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या ३ वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे
👉५. व्यवसायातील भ्रष्ट, अनैतिक, अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे
👉६. शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे. माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की, त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरीसुद्धा एडमिट केले जाते. त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसविले जाते. रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो. ७/८ दिवसात सुटी दिली जाते. तोपर्यंत त्याचे लाखोंचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरच्या खात्यात जमा झालेले असते. अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्याचा, उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो
हा मेसेज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब यापासून वाचायला हवे*
हे पण वाचा: उतारवयातील सामान्य समस्या आणि ऑयुर्वेदिक उपाय