Unified Pension Scheme चा जुमला

Unified Pension Scheme: केंद्र सरकारने आज 24 ऑगस्ट 2024 रोजी जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) मागणीला पद्धतशीरपणे बगल देऊन UPS (Unified Pension Scheme) नावाची तिसरीच पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाय..

देशातील मीडिया व काही लोकं याला खूप वरचढ करून प्रेसेंट करत आहे..

Unified Pension Scheme

खरं तर हा निर्णय दूसरा तिसरा कोणताही नसून आपल्याला अपेक्षित असलेल्या GPS प्रमाणे निर्णय आहे.. यात आपल्या वेतनातून 10% अंशदान हे सुरूच राहील.. सरकारने शासन अंशदानाची रक्कम 14% वरून 18.5 % वाढवली आहे..

यात 5 गोष्टींचे आश्वासन (ग्यारंटी ) तेवढी मिळालेली आहे, पण त्यासाठी कोणती किंमत मोजावी / काय अटी असतील हे पण बघा..👇🏻 ‘Unified Pension Scheme’

मुद्दा क्र.१. Assured pension 50%.. शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन ची ग्यारंटी..

अट- किमान 25 सर्व सेवा ( 25 वर्ष वेतन कपात असणे बंधनकारक)

ज्यांची सेवा 25 वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना त्याप्रमाणात कमी पेन्शन दर राहील..
( बहुतेक 1 वर्षाला 2 % यानुसार पेन्शन दर..) उदा- 20वर्ष सेवा- तर 40% पेन्शन, 15 वर्ष – 30%पेन्शन , 10 वर्ष सेवा- 20% पेन्शन/किमान पेन्शन.. )

मुद्दा क्र. २- Assured Family Pension @60%.. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसास निवृत्तीवेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्तीवेतन..

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर वारसास (जोडीदाराला) पेन्शन च्या 60% पेन्शन.. (अंतिम वेतनाच्या 30% )

मुद्दा क्र- ३)Assured Minimum Pension: @ 10000 per month..
दरमाह 10,000 रु इतकी किमान पेन्शन ..

अट- किमान सेवा 10 वर्ष..
(किमान कपात 10 वर्ष आवश्यक)

मुद्दा क्र. ४ ) Inflation Indexation: (महागाई निर्देशांक) DA दरवाढ राहील..

मात्र वेतन आयोग असणार नाही..
वेतन आयोग लाभ नसल्याने जो कर्मचारी ज्या पेन्शन बेसिक वर आहे, तो कायमस्वरूपी त्याच बेसिक वर राहील..

जेव्हा की जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन बेसिक (एकूण पेन्शन ) 30 ते 40% वाढते तशी वाढ यात कायमस्वरूपी नसेल..

मुद्दा क्र. ५) Lump-Sum payment at superannuation.. 1/10 of monthly emolument (pay + DA) as on the date of superannuation for every completed six months of service
अर्थात आपल्या कर्मचारी अंशदानातून निश्चित रक्कम परत मिळेल..
पण किती.? – 100 % अंशदान.?

नाही..
तर सेवानिवृत्तीवेळी जे शेवटचं वेतन असेल त्याच्या 10% × एकूण सेवा वर्ष च्या दुप्पट ( एकूण कपात वर्ष च्या दुप्पट..)

आज च्या नुसार Basic + DA दोघे मिळून 60000 रु असेल आणि एकूण सेवा 25 वर्ष असेल तर ( 60,000×10% ) × 25 (एकूण सेवा /कपात वर्ष ) × 2 ( प्रति सहामाहीला 1 याप्रमाणे..)
= 6000 × 25× 2
= 6000 × 50
= 300000 रु ( तीन लाख चाळीस हजार रु..)

जर 25 वर्षात आपली रक्कम 25 लाख रु जरी जमा (कपात) झाली असली तरी फक्त वरील फॉर्म्युला नुसार आपल्याला फक्त अडीच ते 3 लाख रु मिळतील , बाकी 90% रक्कम ( 22 लाख रु) सरकार जप्त करेल..

थोडक्यात 22 लाख रु जप्त करून 60,000 च्या 50% पेन्शन म्हणजे 30,000रु मिळेल.. ‘Unified Pension Scheme’

सेवानिवृत्त कर्मचारी समजा 3 ते 4 वर्षांनी मृत्यु पावला तर त्याच्या पत्नीला (60%पेन्शन ) म्हणजे 18,000 रु पेन्शन मिळेल..

त्या 5 वर्ष जगल्या तर त्यांना एकूण पेन्शन मिळेल..
18000×12×5 =
18000×60 = 108000 साधारणपणे 10 ते 12 लाख पेन्शन…

त्या आधी मयत कर्मचाऱ्यांस 4 वर्षात एकूण पेन्शन 3.6 लाख ×4 वर्ष = 14.4 लाख रु..

सरकारने जप्त केलेली 10% रक्कम 22 लाख रु + 9 वर्षाचे व्याज ( 20 लाख रु..) = एकूण 42 लाख रु

42 लाख रु घेऊन सरकार देतेय ‘Unified Pension Scheme

12 लाख + 14 लाख = 26 लाख रु

DA महागाई रक्कम धरली तरी 35 लाख च्या आतच..

म्हणजेच कर्मचाऱ्यांची रक्कम जप्त करून कर्मचाऱ्यांना पेन्शन दिल्याचा मोठेपणा म्हणजे ही UPS पेन्शन योजना..

तोटे-

  1. या योजनेत ज्या 10 / 12 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांस जुन्या पेन्शन योजनेत 50% पेन्शन मिळते तशी न मिळता किमान 10,000 रु वर बोळवण होईल, आणि हे 10,000 रु ही 10/ 12 वर्षांची कर्मचारी कपात रक्कम जप्त करून मिळतील..
    उदा- जिथे OPS नुसार विनाअट 30,000 रु पेन्शन
    मिळायला पाहिजे तिथे या हायब्रीड UPS पेन्शन मध्ये केवळ 10,000 पेन्शन मिळेल, व त्यासाठीही कर्मचाऱ्याचे कपातीचे जवळपास 10 लाख रु जप्त केले जातील..
  2. UPS पेन्शन योजनेत नवीन वेतन आयोग लागू होणार नाही , त्यामुळे जुन्या पेन्शन धारकांच्या तुलनेत भरीव अशी 30 ते 40% ची पेन्शन वाढ मिळणार नाही.. किंबहुना यात ते मिळू शकत नाही..
  3. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास वयाच्या 80 व्या वर्षी सरसकट 20% पेन्शन वाढ मिळते, तर 85 वर्षी 30% वाढ, 90 व्या वर्षी 40% , 95 वर्षी 50% , आणि 100 वर्षी 100% पेन्शन वाढ मिळते.. तर या UPS मध्ये तशी कोणतीही पेन्शन वाढ नसेल.. ‘Unified Pension Scheme’
  4. यासोबतच जुन्या पेन्शन योजनेतील कंत्राटी सेवा पेन्शन साठी ग्राह्य धरणे, सेवेत खंड क्षमापीत करणे, असे कोणतेही लाभ नियम या सुधारित UPS पेन्शन मध्ये नसणार आहेत कारण ही कपात आधारित पेन्शन योजना आहे..

एकंदरीत UPS योजना ही जुनी पेन्शन योजना नाहीच..

आपला संघर्ष हा असल्या UPS किंवा GPS साठी न्हवता हे आपण कायम लक्षात ठेवा.. कदाचित आपलं राज्य सरकारन पण ही UPS योजना आणू पाहिल पण सरकारने कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, असले मधले मार्ग आम्हाला मान्य नाहीत..’Unified Pension Scheme’
एकच मिशन सरसकट जुनी पेन्शन..

Read more: Dr. BAMU Foundation Day