करिअर आणि मानसिक आरोग्य: एखाद्या काळातल्या समाजमनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव होता किंवा आहे हे जाणून घ्यायचे असल्यास किंवा त्या काळातल्या समाजव्यवस्थेचे प्राधान्य कोणत्या गोष्टींसाठी होते हे ओळखायचे असल्यास, त्या काळात कोणत्या शब्दांना महत्व प्राप्त झाले होते याचा मागोवा घ्यावा. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य, क्रांतिकारकांच्या जमान्यात वंदेमातरम, गांधीजींच्या काळात चलेजाव या शब्दांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते आणि त्यावरून आपल्याला त्यावेळचा समाज कश्याने पछाडलेला होता, त्यांचे प्राधान्य कश्याला होते हे कळत होते.
करिअर आणि मानसिक आरोग्य
आजच्या काळात डोकावून पाहिले तर सगळी कडून आपल्याला ‘करिअर’ ‘करिअर’ हा शब्द ऐकू येईल. त्याच बरोबर हल्ली ‘मानसिक आरोग्य‘ हा शब्दही वारंवार ऐकू येऊ लागला आहे. WHO, United Nations, विविध प्रकारच्या NGOs सध्या मानसिक आरोग्याबद्दल खूप जनगृती करताना दिसत आहेत. याचा अर्थ आजच्या जगात करिअर आणि मानसिक आरोग्य या दोन शब्दांना खूप महत्व प्राप्त झालेले दिसते. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य‘
जर आपण बारकाईने पाहिले तर या दोन शब्दांतला परस्पर संबंध आपल्याला दिसून येईल. असुरक्षित करिअर, करिअर मधले न मिळणारे, न मिळवता येणारे अपेक्षित यश, प्रमोशनच्या स्पर्धेत टिकाव धरताना अथवा स्थान टिकवून धरताना निर्माण होणारा स्ट्रेस, अत्यंत वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान, त्याच्या वेगा बरोबर राहताना लागणारी धाप, या सर्व गोष्टींमुळे स्वतःसाठी – कुटुंबासाठी देता येणारा अत्यंत तुटपुंजा वेळ, त्यातून बिघडत जाणारी जवळची नाती या सर्व गोष्टींचा मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये खूपच महत्वाचा वाटा आहे. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
पालकांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता
तेव्हा ‘करिअर’ आणि ‘मानसिक आरोग्य’ या दोन शब्दांच्या परस्पर संबंधाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर काय दिसून येते? पालकांच्या मनात निर्माण झालेली आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल कमालीची असुरक्षितता, साशंकता दिसून येते. आणि त्याच बरोबर हे आव्हान पेलण्यासाठी आपल्या पाल्यांनी नेमकी काय आणि कशी पूर्वतयारी करावी याचे अज्ञान दिसून येते.
आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित असेल ना? या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना टिकाव धरता येईल ना? त्यांचे करिअर छान होईल ना? त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहता येईल ना?, पुरेसा पैसा मिळवता येईलना? आपल्या मुलांचे जीवन आनंददायी बनेल ना? या सारख्या अनेक प्रश्नांच्या विळख्यात आजचा पालक आणि त्यामुळे ओघाने त्यांचे पाल्य आले आहेत. विचारपूर्वक पहाता हे प्रश्न अजिबात चुकीचे नाहीत. कोणाही पालकांना, विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडणे साहजिकच आहे. गडबडप्रश्नांच्या मध्ये नाहीच आहे, खरी गडबड समाजाने, शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकतेने शोधलेल्या प्रश्नांच्या अर्धसत्य उत्तरात आहे. ही कोणती उत्तरे आहेत आणि का ही उत्तरे अर्धसत्य आहेत? ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
पाहिले ‘अर्धसत्य’ उत्तर हे आहे की आनंददायी जगण्यासाठी उत्तम पैसा मिळवता येणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा झाला की भरपूर पैसा मिळवता आला = की जगणे आनंददायी होते. या – विधानातच त्याचे फोलपण दडले आहे. – योग्य मागीने मिळवलेला भरपूर पैसा हा जीवन आनंददायी होण्यात महत्वाची भूमिका बजावतो हे नक्की पण पैसाअसला की जगणे आनंददायी होते हे मुळातच चुकलेले सूत्र आहे. आनंदपैशाने विकत घेता येत नाही. नाती पैशाने बांधून ठेवता येत नाही. शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम आणि शिस्तच पालवी लागते, ते पैशाने विकत घेता येत नाही. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
तेव्हा पैशाचे सामर्थ्य आणि त्याच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी मुलांपर्यंत पोचविण्यात पालक आणि शिक्षण व्यवस्था आज कमी पडत आहेत. भरपूर पैसा म्हणजे आनंददायीजीवन हे सूत्र मुलांच्या आणि पालकांच्या मनावर ठसवण्यात सामाजिकव्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकता कमालीची यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
दुसरे ‘अर्धसत्य’ उत्तर हे आहे की यशस्वी जीवनाचा सहज सोपा फॉर्म्युला म्हणजे
दहावी- बारावीतले मार्काचे उत्तम परसेंटेज, उच्च्य व्यावसायिक पदवी, चांगली नोकरी वा व्यवसाय उत्तम करिअर, भरपूर पैसा यशस्वीजीवन आणि हा फॉर्म्युला दहावी बारावी पासून सुरु होतो म्हणून त्यावेळच्या मार्काना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला चुकीचा कसा ? म्हणजे मार्काना काहीच महत्व नाही का? मुलांनी उत्तम मार्क्स मिळवायला पाहिजेत असा आग्रह पालकानी, शाळांनी धरायचाच नाही का? इथेच तर खरी गोम आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये मुलांनी परीक्षेत मिळवलेले मार्क्स हेच त्यांच्या बुद्धिमत्तेचे निदर्शक झाले आहे. म्हणजे परीक्षेत कमी मार्क म्हणजे मुलगा ‘ढ गोळा’ आणि परीक्षेत उत्तम मार्क म्हणजे मुलगा म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र असे दोन टोकाचे समज आपल्या समाजात कधीचेच रुढ झाले आहेत. याचा दुसरा अर्थ असा की कमी मार्क मिळालेला हा वेगळ्या क्षेत्रात सरस्वती पुत्र असण्याची शक्यता असू शकते आणि परीक्षेत उत्तम मार्क्स न मिळालेला खरे फिल्ड प्रॉब्लेम्स सोडविण्यात ‘ढ गोळा’ असण्याची पण शक्यता असू शकते. कारण दहावी – बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स – मिळविण्यात तंत्राचा, पाठांतराचा खूप मोठा भाग असतो. – ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
एका सर्व्हेच्या आधारे उदाहरण पायच म्हणालात तर असे लक्षात आले की —
- ज्या विद्यार्थ्यांना ८५ /90 % मार्क्स आहेत अश्या विद्यार्थीपैकी
- फक्त २३ टक्के विद्यार्थ्यांची आकलन शक्ती विकसित झाली आहे.
- फक्त १९ टक्के विद्यार्थ्यांचे विचार कौशल्य विकसित झाले आहे.
- फक्त १५ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली आहे.
- आणि १३ टक्के विद्यार्थ्यांच्या मध्ये जिद्द, चिकाटी, आव्हाने स्वीकारायची क्षमता विकसित झाली आहे.
काय होतो याचा अर्थ ?
८० टक्के विद्याथी हे खऱ्या अर्थाने विद्याथी नसून फक्त परीक्षाथी आहेत. म्हणजे त्यांना विषयांचे ‘आकलन’ जरी झाले नाही तरी रट्टा मारून त्यांना मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजेच त्या विषयातल्या संकल्पना कुठे, कधी आणि कश्यासाठी वापरायच्या हे त्यांना कळलेले नाही पण त्यांना मार्क्स मिळाले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ न्यूटनचा तिसरा सिद्धांत जरी पाठ असला तरी तो रोजच्या जीवनात कधी, कसा आणि कुठे वापरतात या प्रश्नाचे उत्तर फार कमी विद्यार्थ्यांना येते. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
त्यामुळे होते काय की मुलांना उत्तम मार्क्स मिळाल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप उंचावतात. पण जेव्हा खड्या आव्हानात्मक व्यावसायिक शिक्षणाला त्यांची सुरुवात होते तेव्हा ही मुलेफार कमी पडू लागतात. कारण त्यांचा शालेय अभ्यास काळात सखोल, डोळस अभ्यासाचा पाया खूप कच्चा राहिलेला असतो. विषयसमजूनघेण्या पेक्षा पाठ करण्यावर, लक्षात ठेवण्यावर भर दिल्यामुळे तार्किक विचार कौशल्ये, भाषा, कल्पनाशक्ती या मुलभूत क्षमता विकसित झालेल्याच नसतात. आणि एकीकडे स्वतःबद्दलच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि दुसरीकडे अपेक्षित यश मिळविण्यासाठी विकसित न झालेल्या क्षमता अश्या कात्रीत विद्याथी आणि त्याचा बरोबर पालक सापडतात. आणि हा चक्रव्ह्युव भेदता न आल्यास इथेच मानसिक आरोग्य बिघडायला सुरुवात होते. आधी विद्यार्थ्यांचे आणि मग पालकांचे. आणि एवढे करूनही व्यावसायिक पदवी मिळवलीच तर पुढे परवड होते प्रत्यक्ष फिल्डवर. कारण जर ज्ञान नसेल तर फिल्ड प्रॉब्लेम्स सोडविता येत नाहीत. मग नोकरीची खात्री नाही किंवा प्रगतीचा आलेख मंद. परत याचा परिणाम मानसिक आरोग्य बिघडणे हाच होतो. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’
पालक समाजात रूढ झालेले तिसरे ‘अर्धसत्य’ उत्तर आहे की जर आपल्या मुलांनी इंजिनिअर, मेडिकल, वकील, प्रोफेसर, आकीटेक्त अश्या मळलेल्या क्षेत्रातच व्यावसायिक शिक्षण घेतले तरच त्यांचे भविष्य सुरक्षित होते. त्यामुळे प्रत्येक पालकांचा आपल्या मुलांना याच क्षेत्रातल्या उत्तम कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळावा असा आग्रह असतो. पण तसे होत नाही आणि मग मनासारख्या कॉलेज मध्ये प्रवेश नाही मिळाला अथवा पाहिजे त्या विषयात प्रवेश नाही मिळाला तरी मानसिक आरोग्य बिघडायला कारण पुरते.
त्यामुळे मानसिक आरोग्याचा बळी न देता उत्तम करिअर घडवता येणे हे एक मोठे आव्हान आजच्या काळात निर्माण झालेले आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थ्यांच्यात अभ्यासाबाबत डोळस जागरूकता निर्माण करणे आणि पालकांना मार्काच्या बरोबरच आपला पाल्य खऱ्याअर्थाने सक्षम कसा होईल याचे ज्ञान देणे फार आवश्यक आहे. ‘करिअर आणि मानसिक आरोग्य’