संत सेवालाल महाराज जयंती 2024: सेवालाल महाराज जयंती दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी भारतातील बंजारा समाजातील 17 व्या शतकातील समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते संत सेवालाल महाराज यांच्या जयंती स्मरणार्थ साजरी केली जाते. समता, न्याय आणि सामाजिक उन्नतीचे प्रतीक म्हणून त्यांचा आदर केला जातो.
संत सेवालाल महाराज जयंती 2024
संत सेवालाल महाराज जयंती हा बंजारा समाजासाठी एक महत्त्वाचा सण आहे आणि मोठ्या भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जातो. संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचे स्मरण करण्याची आणि त्यांचे न्याय्य व विचार समाजाच्या मनामध्ये बिंबवण्याचे कार्य जयंती निमित्त केले जातात. 2024 मध्ये सेवालाल महाराज जयंती वार गुरुवार, 15 फेब्रुवारी रोजी साजरी केले जाईल त्यामध्ये प्रामुख्याने प्रभातफेरी व शोभा यात्रा काढले जातात, पहाटे संत सेवालाल महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते आणि दुपारी भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये भक्त भजन गातात आणि बॅनर आणि फलक घेऊन जातात. संध्याकाळी धार्मिक प्रवचन आणि भक्ती गायन सत्र आयोजित केले जातात.त्याच बरोबर सामुदायिक मेजवानी (लंगर) आयोजित केली जाते जिथे सर्व स्तरातील लोक एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात..
सेवालाल महाराजांचा इतिहास:
जन्म आणि बालपण:
सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोडनकोप्पा येथे झाला. ते गोर राजवंशी बंजारा समाजातील भीमा नायक आणि धर्मणी यांचे पुत्र होते. लहानपणापासूनच ते हुशार आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांनी संस्कृत, हिंदी आणि मराठी भाषांचे शिक्षण घेतले. सेवालाल महाराजांचा मृत्यू ४ जानेवारी १७७३ रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झाला. आजही ते बंजारा समाजाचे प्रमुख दैवत मानले जातात आणि त्यांच्या जन्मदिवसाला “सेवालाल महाराज जयंती” म्हणून साजरा केला जातो.
सामाजिक कार्य: सेवालाल महाराज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सामाजिक अन्याय आणि विषमतेमुळे खूप व्यथित झाले होते. गरीब आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक समता आणि न्यायाचा संदेश देत त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. १८ व्या शतकात, बंजारा समाज अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांशी झुंजत होता. सेवालाल महाराजांनी या समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शाळा आणि मठ स्थापन केले. स्त्रियांना शिक्षण आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जातीभेद आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात त्यांनी लढा दिला. गरीब आणि गरजू लोकांसाठी त्यांनी अनेक दानधर्म कार्ये केली. ‘संत सेवालाल महाराज जयंती 2024’
धार्मिक कार्य: सेवालाल महाराज हे एक उत्तम संत आणि आध्यात्मिक गुरु होते. त्यांनी भक्तीमार्गाचा प्रचार करून लोकांना ईश्वराकडे आकर्षित केले. त्यांनी अनेक भजने आणि अभंग रचले, जे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी जगदंबा देवीची उपासना केली आणि तिच्या नावावर अनेक मंदिरे बांधली. ‘संत सेवालाल महाराज जयंती 2024’
सेवालाल महाराजांचे विचार: सर्व माणसे समान आहेत आणि सर्वांना समान हक्क मिळायला हवेत. शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन आहे. स्त्रियांना शिक्षण आणि समान हक्क मिळणे गरजेचे आहे. जातिभेद आणि अंधश्रद्धा यांसारख्या सामाजिक वाईट गोष्टींचा नायनाट करणे आवश्यक आहे. गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हे माणुसकीचे कर्तव्य आहे. सेवालाल महाराजांचे कार्य आजही प्रासंगिक आहे आणि ते आपल्याला समाज सुधारण्यासाठी प्रेरणा देतात. ‘संत सेवालाल महाराज जयंती 2024’
सेवालाल महाराजांचा जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि संदेश
शुभेच्छा:
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! ‘संत सेवालाल महाराज जयंती 2024’
समाज सुधारणा आणि मानवतेच्या कार्यासाठी समर्पित संत सेवालाल महाराजांना जयंतीनिमित्त वंदन!
बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
॥ जय सेवालाल ॥
गोर बोली पर करो प्रेम गोर बोली बाप- दादार देन भुला
जाय गोर बोली तो वळकावा कोनी गोर केन
सद्गुरू सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर
सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी
गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…
सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम
वेगवेगळो तारो गोत्र
पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र
संत सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
जग काई कच, काई करच,
येर विचार तू मत कर ,
जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,
वुच तू कर
संत सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
केरी तू निदा मत कर
केरी तू ईर्षा मत कर
अच्छे वाटेप चाल तू
ध्येय तू हासील तू कर
संत सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
मनेम सेवालाल
दिलेंम सेवालाल
आंखीम सेवालाल
जगेम सेवालाल
संत सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!!
बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर
सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी
गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…
सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
एक तांडेर एक नायक ,
वो तांडेर वू नायक
एक तांडेर एक नायक
वो तांडेर वू नायक
पण सारेती मोठो
एकच नायक
सेवालाल नायक
संत सेवालाल महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
संदेश:
सेवालाल महाराजांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा आजही प्रासंगिक आहे ते पुढे नेहण्याचे कार्य करू या.
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर करण्यासाठी त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया.
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जातिभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी आपण एकत्र येऊया. ‘संत सेवालाल महाराज जयंती 2024’
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेऊया.
सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करूया.
‘संत सेवालाल महाराज जयंती 2024‘